मुख्यमंत्री ठाकरेंचा अहमदनगरमध्ये प्लॉट..कोण म्हणतं गुंतवणूक होत नाही

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 12 May 2020

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची संपत्ती किती याविषयी अनेकांना उत्सुकता होती. विधान परिषदेचा अर्ज भरताना आज ते शपथपत्र सादर करतील आणि त्यातून आपल्याला त्यांची संपत्ती कळेल असे वाटत होते.

नगर ः अहमदनगर जिल्हा आकाराने अवाढव्य आहे. त्यामुळे त्याचे दक्षिण आणि उत्तर असे दोन भाग पडले आहेत. गेल्या बऱ्याच दिवसांपासून जिल्ह्याचे विभाजन करावे, अशी मागणी जोर धरीत आहे.

काँग्रेस-राष्ट्रवादीच्या काळात बबनराव पाचपुते पालकमंत्री असताना त्यांनी या मुद्याला हवा दिली. परंतु संगमनेर की शिर्डी का श्रीरामपूर असा मुख्यालयाचा वाद रंगत राहिला. नंतर भाजपच्या काळात राम शिंदे पालकमंत्री झाल्यावर त्यांनी हा मुद्दा उचलून धरला. परंतु त्यांनाही जमलं नाही.

हेही वाचा - सावधान..नगरमध्ये पुन्हा शिरला कोरोना

नगर जिल्ह्याच्या उत्तर भागात सुकाळ आहे. मात्र, जिल्ह्याचे मुख्यालय तसेच ओस पडले आहे. मागून नाशिक आणि औरंगाबाद शहराचा उद्योग वाढला. मात्र, नगर शहराला एमआयडीसीही जपता आली नाही. एकीकडे उद्योग नगरकडे पाठ फिरवित नेते नगरमध्ये गुंतवणूक करीत आहेत.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची संपत्ती किती याविषयी अनेकांना उत्सुकता होती. विधान परिषदेचा अर्ज भरताना आज ते शपथपत्र सादर करतील आणि त्यातून आपल्याला त्यांची संपत्ती कळेल असे वाटत होते. 

निवडणूक आयोगाला सादर केलेल्या शपथपत्रात उद्धव ठाकरे यांनी आपल्या संपत्तीचे विवरण दिले आहे..

उद्धव ठाकरे यांनी आपला व्यवसाय सर्व्हिस असा दिला. उद्धव ठाकरेंची एकूण जंगम मालमत्ता 24 कोटी 14 लाख इतकी आहे.​कॅश इन हॅंड, बँक डिपॉझिट्स, शेअर्स, बाँड्स, फंड्स - 21 कोटी 68 लाखविमा पॉलिसी, दागिने हे सर्व मिळून त्यांची मालमत्ता 24 कोटी 14 लाख आहे. उद्धव ठाकरे यांच्या नावावर वाहन नाही.

अहमदनगर आणि माहीममध्ये प्लॉट्स त्यांची एकूण किंमत - 4 कोटी 20 लाख इतकी आहे. त्यावर बांधकामानंतर त्या जागेची किंमत - 13 कोटी 64 लाख इतकी आहे. याबाबत बीसीसी मराठीने वृत्त दिले आहे.

कोण म्हणतं गुंतवणूक होत नाही

गर शहरात कोण म्हणतं गुंतवणूक होत नाही. बघा, थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा प्लॉटस आहे. त्यामुळे इतरांनी उगाचआवई उठवू नये, असे सोशल मीडियात ट्रोलिंग सुरू झाले आहे. परंतु त्यांचा प्लॉट नेमका कुठे आहे समजू शकले नाही.
 

 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Chief Minister Thackeray's plot in Ahmednagar