esakal | फोन पे चर्चा करून मराठ्यांना आरक्षण कसं मिळायचे हो साहेब
sakal

बोलून बातमी शोधा

Chief Minister Uddhav Thackeray interacts with citizens on Facebook live

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नागरिकांशी फेसबुकवरुन संवाद साधला. यावेळी मराठा आरक्षणाबाबत विरोधी पक्षदेखील सरकारबरोबर असल्याचे त्यांनी सांगितले. यासंदर्भात विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्याशी माझं फोनवर बोलणं झालं असल्याचे ठाकरे यांनी सांगितले.

फोन पे चर्चा करून मराठ्यांना आरक्षण कसं मिळायचे हो साहेब

sakal_logo
By
अशोक मुरुमकर

अहमदनगर : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नागरिकांशी फेसबुकवरुन संवाद साधला. यावेळी मराठा आरक्षणाबाबत विरोधी पक्षदेखील सरकारबरोबर असल्याचे त्यांनी सांगितले. यासंदर्भात विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्याशी माझं फोनवर बोलणं झालं असल्याचे ठाकरे यांनी सांगितले. हे सांगताना फडणवीस हे बिहारमध्ये असल्याचा उल्लेख केला. दरम्यान फडणवीस यांनीही सरकार जो निर्णय घेईल त्याला आमचे सहकार्य असल्याचे सांगितले. मात्र, नेटिझन्सनी यावर जोरदार ठिपणी करत ‘फोन पे चर्चा करुन कसे हो साहेब’ असा प्रश्‍न केला आहे.

मराठा आरक्षणाला स्थगिती मिळाल्याने तरूण कार्यकर्त्यात अस्वस्थता पसरली. ज्या तडफेने मराठा आरक्षणाच्या आंदोलनात तरूणांनी योगदान दिले त्याच्या आठवणी आजही कायम आहेत. सर्वोच्य न्यायालयाचा निकाल आला आणि सर्वांनाच धक्का बसला. मराठा क्रांती मोर्चाच्या काळात संघटनांनी एकत्रितपणे व्रजमूठ बांधून लढा दिला. आरक्षणाला स्थगिती मिळाल्यामुळे समाजामधून संताप व्यक्त केला जात आहे. पुढील दिशा ठरवण्यासाठी समाजाच्या वतीने बैठका झाल्या आहेत. काही ठिकाणी अंदोलनेही झाली. 

यावर बोलताना मुख्यमंत्री ठाकरे यांनी आरक्षणाबाबत सरकार सकारत्मक असल्याचे सांगितले. यासंदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार, एकनाथ शिंदे, विजय वडेट्टीराव, अशोकराव चव्हाण, बाळासाहेब थोरात, दिलीप वळसे पाटील, जयंत पाटील आदींशी चर्चा करुन आपण काय बोलले पाहिजे यासाठी चर्चा केली होती. यावर अजूनही बैठक होणार आहेत. यावर पुढे काय करायचे याची चर्चा केली जात आहे. विरोधीपक्ष नेत्यांना सुद्धा मी फोनवर बोललो आहे. याआधीही त्यांना बैठकीला बोलावले होते. तेव्हा ते बिहारला होते. मात्र, त्यांनी कोणताही निर्णय घ्या, आम्ही तुमच्या बरोबर असल्याचे सांगितले.

आरक्षणाबाबात सर्व पक्ष एकत्र आहेत. मराठाला आरक्षण देण्यासाठी सर्वांनी एका मताने निर्णय घेतला होता. याआधी भाजप आणि शिवसेनेचे सरकार होते. तेव्हा काँग्रेस व राष्ट्रवादी विरोधी पक्ष होते. मराठा आरक्षणावर सर्वांनी निर्णय घेतला आहे. पहिल्या सरकारने दिलेले वकील आपण बदलले नाहीत. ज्या सूचना दिल्या ते वकील आपण घेतले. कोठेही आपण कमी पडलेलो नाहीत. 

अनपेक्षीतपणे आपण दिलेल्या आरक्षणाबाबत अंतरिम स्थगिती दिली आहे. तुमच्या भावना आणि आमच्या भावना एकच आहेत. येथे तर सरकार आपलेच आहे, असंही ते म्हणाले. 

देवेंद्र फडणवीस म्हणाले, मराठा आरक्षणावर स्थगिती आल्यानंतर पुढील दिशा ठरविण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी माझ्याशी दूरध्वनीवर चर्चा केली. हा आमच्यासाठी राजकीय मुद्दा नाही. मराठा आरक्षण पुन्हा बहाल करण्यासाठी सरकार जो काही निर्णय घेईल, त्याला आमचे संपूर्ण सहकार्य असेल, हे आश्वस्त केले.

नेटिझन्स म्हणतात...
सदाशीव पवार यांनी म्हटलंय की, फोन पे चर्चा करून कस हो साहेब. नंदकुमार परागकर यांनी म्हटलंय की, राज्य सरकार बरोबर केंद्र सरकारने ही लोकसभेत मराठा समाजाला आरक्षण देण्याचं अद्यादेश काढून निर्णय घ्यायला हवा. रमेश तावडे यांनी म्हटलं आहे की, द्रेवेंद्रजी, तुम्ही म्हणजे आपले विरोधी पक्षनेते. बिहारमध्ये आहात, अस मुख्यमंत्री राज्यातल्या जनतेला सांगत होते. त्याचा अर्थ समजलाच नाही.