ishwar vairagar
sakal
सोनई - महावीर पेठ ते हलवाई गल्ली रस्त्यावरील विठ्ठल मंदिराच्या शेजारी सुरू असलेल्या घर आणि दुकानाच्या बांधकामासाठी बांधलेल्या पहाडाच्या लोखंडी खांबास चिकटून अंबिकानगर येथील ईश्वर राहुल वैरागर (वय सात) याचा मृत्यू झाला आहे. जक्की तांबोळी (वय सात) हा फेकला गेल्याने बचावला आहे. जवळच असलेल्या किराणा दुकानात मुले खाऊ घेण्यास आले असता घटना घडली.