
जामखेड : तालुक्यातील अरणगाव येथे नियोजित बालविवाह उडान बालविवाह प्रतिबंधक प्रकल्प, जामखेड पोलिस आणि अरणगावचे ग्रामविकास अधिकाऱ्यांनी रोखला. अरणगावातील एका अल्पवयीन मुलीचा विवाह निश्चित करण्यात आला होता. या संभाव्य बालविवाहाची माहिती उडान हेल्पलाईनवर आलेल्या एका गोपनीय फोनद्वारे समन्वयक प्रवीण कदम, योगेश अब्दुले यांना माहिती मिळताच बालहक्क कार्यकर्ते योगेश अब्दुले यांनी ही माहिती पोलिसांना दिली.