धक्कादायक! 'अत्याचार प्रकरणात साक्ष देऊ नये म्हणून महिला साक्षीदारास धमकी'; चित्ते, कुरेशींविरुद्ध अॅट्रॉसिटीचा गुन्हा
Witness Intimidation in Assault Case: सदर प्रकरणाची सुनावणी श्रीरामपूर न्यायालयात सुरू असून, ती साक्ष देण्यासाठी वेळोवेळी श्रीरामपूरला येते. ८ ते १० दिवसांपूर्वी ती श्रीरामपूर येथे आल्यानंतर नेवासे रस्त्यावरील बोगद्याजवळ चित्ते यांनी स्कूटीवरून तिला अडवले.
Police action after woman witness threatened in ongoing assault case; Atrocity charges filed against accused.Sakal
श्रीरामपूर : शारीरिक अत्याचार प्रकरणात साक्ष देऊ नये, म्हणून महिला साक्षीदारास धमकी दिल्याप्रकरणी हिंदू रक्षा कृती समितीचे प्रकाश चित्ते व रिजवान कुरेशी यांच्याविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात अॅट्रॉसिटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.