esakal | शेतकरी गाढ झोपेत असतानाच कांदा चाळ पेटवली; सुमारे चाडेचार लाखाचे नुकसान
sakal

बोलून बातमी शोधा

Chombhut Narayan Barkade onion fire in Parner taluka

चोंभुत (ता. पारनेर) येथील नारायण बरकडे यांच्या कांदा चाळीला कोणीतरी आग लावुन पेटुन दिल्याने मोठे नुकसान झाले आहे.

शेतकरी गाढ झोपेत असतानाच कांदा चाळ पेटवली; सुमारे चाडेचार लाखाचे नुकसान

sakal_logo
By
सनी सोनावळे

टाकळी ढोकेश्वर (अहमदनगर) : चोंभुत (ता. पारनेर) येथील नारायण बरकडे यांच्या कांदा चाळीला कोणीतरी आग लावुन पेटुन दिल्याने मोठे नुकसान झाले आहे. कोरोना आजाराचं महासंकट त्यात लॉकडाउनमध्ये रखडलेला कांदा आणि लॉकडाउन कुठे हटतो ना हटतो तोच कांदा पिकाने दराच्या बाबतीत घेतलेला उचांक, मध्यंतरी निर्यात बंदीने शेतकऱ्याची अचानक झोप उडवली असताना या साऱ्या कांद्याच्या घडामोडींवर मात करत चोंभूत येथील शेतकरी नारायण केरू बरकडे यांनी पैशाच्या आशेपोटी कांदा राखून ठेवला होता. 

या कांद्याच्या चाळीला अनोळखी व्यक्तींनी बुधवारी (ता. ३०) पेटवून दिल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. सदर कांदा चाळीत सुमारे ३०० गोणी इतका कांदा होता. साधारण १०० गोणी कांदा जळून खाक झाल्याने आताच्या बाजार भावाप्रमाणे दोन लाख रुपयांचे नुकसान झाले असून चोंभू परिसरात शेतकऱ्यांकडुन अशा मनोवृत्तीचा जाहीर निषेध होत आहे.

या संदर्भात तालुका कृषी अधिकारी रामदास दरेकर यांना भ्रमणध्वनी वरून संपर्क केला असता तातडीने घटनास्थळी भेट दिली. झालेल्या घटनेचा पंचनामा करण्यात आला आहे. पारनेर पोलिस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात तक्रार देण्यात आली आहे.

साडेचार लाखांना दिला होता कांदा...
शेतकरी नारायण केरू बरकडे यांनी ३ दिवसांपूर्वी कांदा चाळ ही कांदा व्यापाऱ्याला साडेचार लाख रुपयांना दिला होता.मात्र हातात पैसे पडण्याआधीच अज्ञात इसमांनी कांदा चाळ पेटवून दिल्याने बरकडे यांना मोठा आर्थिक फटाका बसला आहे.

संपादन : अशोक मुरुमकर