esakal | अपहरणकर्त्यांची पाच लाखांची मागणी; सिनेस्टाईल कारवाईने पोलिसांकडून पर्दाफाश
sakal

बोलून बातमी शोधा

police

5 लाख मागणाऱ्या अपहरणकर्त्यांवर पोलिसांची सिनेस्टाईल कारवाई

sakal_logo
By
मनोज जोशी

कोपरगाव (जि. अहमदनगर) : कोपरगाव बसस्थानक परिसरात सचिन वसंत जाधव यांचे चारचाकी वाहनातून अपहरण करण्यात आले होते. पाच लाखांची खंडणी मागणाऱ्या टोळीचा पोलिसांनी सिनेस्टाईल धरपकड करुन पर्दाफाश केला. अपहरकर्त्यांमध्ये महिलांचाही समावेश होता. वाचा सविस्तर...

(Cinestyle-police-action-against-kidnappers-in-ahmednagar-marathi-news)

पोलिसांनी जाणले घटनेचे गांभीर्य

कोपरगाव बसस्थानक परिसरातून गुरुवारी (दि.१५) दुपारी अज्ञात व्यक्तींनी जाधव यांना चारचाकी वाहनात जबरदस्तीने बसवत त्यांचे अपहरण केले. जाधव यांची पत्नी भावना जाधव यांच्याकडे सुटकेसाठी तब्बल पाच लाख रुपयांची मागणी केली. भावना जाधव यांनी शहर पोलिस स्टेशन गाठत रितसर तक्रार दाखल केली. पोलिस निरीक्षक वासुदेव देसले यांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेत अपहरणकर्त्यांचा शोध सुरू केला.

हेही वाचा: अनिल देशमुख गायब असल्याच्या चर्चा रंगताच 'तो' VIDEO झाला व्हायरल

...असा केला आरोपींचा पर्दाफाश

आरोपींच्या मोबाइल नेटवर्कनुसार आरोपी आळेफाटा परिसरात असल्याचे लक्षात आले. त्यानंतर तेथे पोलिसांनी सापळा लावला. आळेफाटा येथील एका खोलीत जाधव यांना डांबून ठेवल्याचे पोलिसांना समजले. त्यानंतर पोलिसांनी सिनेस्टाईलने धरपकड करुन आरोपी एकनाथ हरिभाऊ हाडवळे (रा. राजुरी, ता. जुन्नर, जि. पुणे), भाऊसाहेब विठ्ठल काळे, सीमा भाऊसाहेब काळे (दोघे रा. समर्थनगर, आळेफाटा, ता. जुन्नर, जि. पुणे), प्रवीण रबाजी खेमनर (रा. आंबोरे, ता. संगमनेर, जि. नगर), प्रमिला महेश पवार (रा. चेहडी, ता. जि. नाशिक) यांना पोलिसांनी विविध ठिकाणांहून सहा लाख १० हजार रुपयांच्या मुद्देमालासह ताब्यात घेतले. त्यात अपहरणात वापरलेली गाडी (एमएच- १४ जेबी ६५७२) व दोन मोबाईलचा समावेश आ‌हे. ही कारवाई पोलिस उपनिरीक्षक भरत नागरे, पोलिस कर्मचारी जी. पी. थोरात, पी. बी. बनकर, विजया दिवे, फुनकार शेख, होमगार्ड दीपक गर्जे यांनी केली.

(Cinestyle-police-action-against-kidnappers-in-ahmednagar-marathi-news)

हेही वाचा: मित्रांमुळे मुलांना वाईट संगत लागलीये? अशा पद्धतीने करा सुटका

loading image