मित्रांमुळे मुलांना वाईट संगत लागलीये? अशा पद्धतीने करा सुटका

अनेकदा किशोरवयीन अवस्थेमध्ये मुलं वाईट मार्गाला लागतात.
Parents have to save their children from Addiction Latest News
Parents have to save their children from Addiction Latest News

आजुबाजूला घडत असलेल्या अनेक घटनांचा परिणाम मुलांवर होत असतो. त्यामुळे मुलांच्या व्यक्तीमत्वाचा विकास होत असताना समाज महत्त्वाचं काम करत असतं. समाजात वावरत असताना आपल्याला चांगले-वाईट असे वेगवेगळ्या स्वभावाचे,व्यक्तिमत्त्वाचे लोक भेटत असतात. मात्र,त्यांच्याकडून नेमकं काय घ्यावं हे आपल्याला ठरवायचं असतं. परंतु, अनेकदा किशोरवयीन अवस्थेमध्ये माणसं ओळखण्याची योग्य पारख नसल्यामुळे मुलं वाईट संगतीत येतात आणि वाईट मार्गाला लागतात. म्हणूनच, जर आपली मुलं वाईट संगतीला लागली असतील तर त्यातून त्यांची सुटका कशी करुन घ्यावी हे पाहुयात. (is-your-child-friend-has-bad-influence)

१. टोमणे मारु नका-

आपली मुलं वाईट संगतीला लागल्याचं समजताच अनेक पालक सतत मुलांना टोमणे मारतात. त्यांच्या करिअरवरुन किंवा मित्रांवरुन कुत्सिकपणे बोलतात. परंतु, पालकांचं असं वागणं पाहिल्यानंतर मुलांमध्ये एक प्रकारचा राग निर्माण होतो आणि ते मुद्दाम पालकांच्या मनाविरुद्ध करु लागतात. त्यामुळेच मुलांना रागावण्यापेक्षा किंवा टोमणे मारण्यापेक्षा त्यांना नीट समजावून सांगा. वाईट संगतीचे दुष्परिणाम काय आहेत हे सांगा.

Parents have to save their children from Addiction Latest News
आषाढी एकादशीचं महत्त्व माहितीये?; का साजरा केला जातो हा दिवस

२. मित्र परिवार वाढवण्यास सांगा -

अनेकदा मुलं वाईट संगतीला लागल्यावर काही ठराविक मुलांच्याच घोळक्यात राहतात. त्यामुळे मुलांची नकारात्मकता वाढते व ते वाईट मार्गाला लागू शकतात. त्यामुळेच मुलांना त्यांच्या मैत्रीच्या कक्षा रुंदावायला सांगा. ठराविक मित्रांच्या पलिकडेदेखील अन्य मित्र आहेत याची जाणीव मुलांमध्ये निर्माण करा. चांगले व वाईट या दोन्ही प्रकारचे मित्र आपल्याला असतात. परंतु, कोणाकडून काय शिकायचं हे आपण ठरवायचं हे मुलांना सांगा.

३. वेळीच चूक निदर्शनास आणा -

जर तुमचा मुलगा किंवा मुलगी एखादं चुकीचं वर्तन करत असतील. तर त्यांची चूक लगेच त्यांच्या निदर्शनास आणून द्या. सुरुवातीला पालकांनी मुलांकडे दुर्लक्ष केलं तर मुलांच्या चुकीला खतपाणी घातल्यासारखं होईल. त्यामुळे तुमच्या नजरेस खटकलेली गोष्ट मुलांना लगेच सांगा.

४. मर्यादा आखा-

खरं तर मुलांना कोणत्याही बंधनात किंवा मर्यादेत अडकवायचं नसतं असं म्हटलं जातं. परंतु, मुले वाईट मार्गाला लागू नयेत यासाठी काही नियम व अटी लागू करणं अत्यंत गरजेचं आहे. मुलांना घरी येण्याच्या वेळा, फोन वापरण्याच्या वेळा निश्चित करुन द्या.

५. संवाद साधा -

अनेकदा पालक व मुलं यांच्यात कम्युनिकेशन गॅप निर्माण झाल्यामुळे मुलं वाईट मार्गाला लागतात. आई-वडिलांचं माझ्यावर प्रेम नाही असा गैरसमज निर्माण करुन मुलं दु:ख विसरण्यासाठी अनेकदा चुकीच्या मार्गाकडे वळतात. त्यामुळे शक्य होईल तितका वेळ मुलांना द्या. त्यांच्याशी संवाद साधा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com