अॉक्सीजन टँकर पोहोचवण्यात हलगर्जीपणा, मंडलाधिकारी निलंबित

अनेकदा फोन करूनही दिले नाही उत्तर
Ahmednagar oxygen tanker
Ahmednagar oxygen tanker Esakal

पारनेर ः ऑक्‍सिजनचा टॅंकर नगर येथे पोचविण्याची जबाबदारी सुपे येथील मंडलाधिकारी शिवाजी शिंदे यांच्यावर सोपविण्यात आली होती. मात्र, कोरोना काळात त्यांनी कर्तव्यात कसूर केल्याने जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी त्यांना निलंबित केले. (Circle suspended due to delay in delivery of oxygen tanker)

जिल्हाधिकाऱ्यांनी काढलेल्या आदेशात म्हटले आहे, की शिंदे यांची चाकण, तळोजा, मुरबाड येथील ऑक्‍सिजन युनिटमधून लिक्विड ऑक्‍सिजन टॅंकर जिल्हा रुग्णालय, रिफिल प्लॅंटपर्यंत पोचविण्यासाठी नियुक्ती करण्यात आली होती. मात्र, त्यांनी त्यांची जबाबदारी व्यवस्थित पार पाडली नाही. समन्वय अधिकाऱ्यांनी अनेक वेळा दूरध्वनी करूनही त्यास प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे जिल्हा रुग्णालय, रिफिल प्लॅंटला ऑक्‍सिजनचा पुरवठा वेळेवर होऊ शकला नाही.

Ahmednagar oxygen tanker
संगमनेरमध्ये जमावाचा पोलिसांवर हल्ला, वाहनांची केली तोडफोड

शिंदे यांनी कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या आपत्कालीन परिस्थितीत कामात अक्षम्य हलगर्जीपणा करून कर्तव्यात कसूर केल्याचे निलंबन आदेशात जिल्हाधिकाऱ्यांनी म्हटले आहे.

पाच वैद्यकीय अधिकारीही आले नाही

कोरोना काळात कोविड सेंटरवर नियुक्‍त्या दिलेल्यांपैकी पाच वैद्यकीय अधिकारी कामावर हजर झाले नाहीत. त्यांना नोटिसा पाठविण्यात आल्या आहेत. त्याची मुदतही संपली आहे. त्यामुळे त्यांच्या निलंबनाचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांना सादर करणार आहे.

- ज्योती देवरे, तहसीलदार, पारनेर

(Circle suspended due to delay in delivery of oxygen tanker)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com