Crowds on the streets
Crowds on the streetsImages by Sakal

संगमनेरमध्ये नागरिकांचा मुक्त संचार सुरूच

विविध कारणांसाठी संचार करणाऱ्या नागरिकांना अडविताना पहिल्याच दिवशी पोलिसांची दमछाक झाली

संगमनेर (अहमदनगर) : कोविडची अधिक तीव्र असलेली दुसरी लाट थोपवून कोरोनाची साखळी तोडण्यासाठी राज्य सरकारने साथरोग अधिनियमांतर्गत 14 एप्रिलच्या रात्री आठ वाजल्यापासून एक मे च्या सकाळी सात वाजेपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत. त्यानुसार शहरात संचारबंदी लागू केली आहे. मात्र, विविध कारणांसाठी संचार करणाऱ्या नागरिकांना अडविताना पहिल्याच दिवशी पोलिसांची दमछाक झाली.

शेवगाव : कोवीड सेंटरला दानशुर व्यक्तींकडून ७० हजारांची मदत

बुधवारी रात्रीपासून राज्य सरकारने निर्बंध कडक केल्यानंतर गुरुवारी सकाळपासून संगमनेर शहर पोलिस ठाण्याची नाकाबंदी पथके शहरातील बसस्थानक परिसर, तसेच शहराच्या पूर्वेच्या प्रवेशद्वारावरील तीन बत्ती चौक, दिल्ली नाका परिसरात रस्त्यावर प्रवाशांची चौकशी व विनाकारण फिरणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी तैनात केली आहेत. मात्र, मागच्या कडक "लॉकडाउन'ला सरसावलेले संगमनेरकर विविध क्‍लृप्त्या योजून शहरात फेरफटका मारण्याची संधी साधत आहेत.

किराणा, भाजीपाला व औषधे या प्रमुख कारणांशिवाय, "दवाखान्यात पाहुण्यांना डबा घेऊन चाललो' अशी पटणारी कारणे नागरिक देत असल्याने, कारवाई नक्की कोणावर करायची, असा संभ्रम नाकाबंदी करणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्यांपुढे निर्माण झाला आहे.

जामखेडची "ऑक्‍सिजन' लेव्हल घटली; 425 रुग्णांच्या नातेवाईकांची वाढली धाकधूक

पोलिसांनी त्यातूनही संशयास्पद वाटणाऱ्यांना पोलिसी खाक्‍या दाखवीत दंडवसुली केली. मात्र, आजही भाजीपाला बाजारात चेहऱ्यावर मास्क लावलेल्या बेफिकीर विक्रेत्यांचे व खरेदीसाठी बिनधास्त फिरणाऱ्या नागरिकांचे विदारक दृश्‍य पाहायला मिळाले. चटकणाऱ्या उन्हामुळे दुपारच्या सत्रात वाहतूक थोडी थंडावली होती. संगमनेर आगारातून नगर, नाशिक व पुण्यासाठी केवळ पाच एसटी बस रवाना झाल्या, तर मुंबईकडे जाणारी बससेवा बंदच आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com