esakal | सिव्हिल हॉस्पिटल हवेतून करणार अॉक्सीजननिर्मिती

बोलून बातमी शोधा

Civil Hospital will produce oxygen

सिव्हिल हॉस्पिटल हवेतून करणार अॉक्सीजन निर्मिती

sakal_logo
By
अशोक निंबाळकर

नगर ः जिल्ह्यातील वाढती कोरोना रुग्णांची संख्या पाहता राज्याचे नगरविकास राज्यमंत्री प्राजक्‍त तनपुरे यांनी काल जिल्हा रुग्णालयाला भेट दिली. यावेळी त्यांनी कोरोना रुग्णांचा वॉर्ड व हवेतून ऑक्‍सिजन तयार करणाऱ्या जिल्हा रुग्णालयात उभारल्या जाणाऱ्या प्रकल्पाची पाहणी केली.

राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी जिल्हा रुगणालयास भेट देऊन येथील विविध विभागांची पाहणी केली. यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुनील पोखरणा उपस्थित होते. यावेळी त्यांनी अनेक रुग्णांचे नातेवाईक यांची देखील चौकशी केली. यावेळी प्राजक्त तनपुरे म्हणाले, ""जिल्हा रुग्णालयात हवेतून ऑक्‍सिजन तयार करण्याचे प्लॅंटचे काम अंतिम टप्यात आले आहे. त्यामुळे लवकर येथील रुग्णांना दिलासा मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले.

तनपुरे गुरुवारी दिवसभर नगरमध्ये होते, त्यांनी जिल्हाधिकारी कार्यलय येथे येऊन निवासी उपजिल्हाधिकारी यांची भेट घेऊन जिल्ह्यातील परिस्थितीचा आढावा घेतला. तसेच जिल्ह्यातील अनेक नागरिकांनी लसीचा पहिला डोस घेतला आहे.

आता त्यांनी दुसरा डोस घेणे महत्त्वाचे आहे. जिल्ह्यातील लसीकरण केंद्रांची संख्या वाढवण्यात येऊन लसीकरणासाठी आलेले नागरिकांना सोयी सुविधा देण्याचा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले. नागरिकांनी नियमाचे पालन करून घरीच राहावे व कोरोनाला हद्दपार करावे, असे आवाहन त्यांनी केले.