‘यांच्या’मुळे जामखेडच्या ‘विंचरणा’चे रुप पालटले

Cleaning of Vincharna river in Jamkhed through the initiative of MLA Rohit Pawar
Cleaning of Vincharna river in Jamkhed through the initiative of MLA Rohit Pawar

जामखेड (अहमदनगर) : आमदार रोहित पवार यांच्या पुढाकाराने 'विंचरणेच' रुप पालटले आहे. घाणीच्या विळख्यातून 'विंचरणा' नदी बाहेर निघाली ऐवढेच नाही तर ती वाहती झाली. तिला मुळ रुप प्राप्त झाले. नदीपात्रात साचलेल्या गाळामुळे निर्माण झालेले दुर्गंधीचे साम्राज्यही 'नष्ट' झाले. निरनिराळ्या प्रदुषणामुळे नदीपात्राचे हरवलेले 'वैभव' पुन्हा प्राप्त झाले, शहरात प्रवेश करताना येणारी दुर्गंधी हटली.

जामखेड शहरात प्रवेश करायचा म्हटलं की विंचरणा ओलांडूनच..! रत्याच्या दोन्ही बाजूला विस्तारलेली विंचरणा आणि तिच्या काठावर विसावलेले जामखेड ऐकेकाळी ऋषीमुनीची तपोभूमी म्हणून धर्मग्रथांत उल्लेख आढळतो. काळाच्या ओघात येथे मोठे बदल झाले. लोकवस्ती वाढली, तशी मोठ्या प्रमाणात वृक्षतोड झाली. झाडांची जागा इमारतींनी घेतली बघता बघता जामखेडचा विस्तार नदीपात्रापर्यंत पोहोचला एवढ्यावरच न थांबता नदीपात्राच्या दोन्ही बाजूने विस्तार झाला. वाढत्या विस्ताराबरोबरच या गावाला वरदान ठरलेली विंचरणा स्वतः चे अस्तित्व कधी हरवून गेली हे कळलंच नाही.

नदीचे रुपांतर नाल्यात झाले. घाणीचा विळखा मोठ्या प्रमाणात वाढला पूर्वीच्या डोहाचे रूपांतर घाण पाण्याच्या डबक्यात झाले आणि त्या डबक्यात मोकाट प्राणी मुक्तविहार करू लागले. त्यामुळे पशु,पक्षी व प्राण्याकरिता पिण्याच्या पाण्याची होणारी सोय आपसूकच बंद पडली. गाळ, खुरटी झुडपे ही मोठ्या प्रमाणात वाढले होते. त्याचा त्रास दोन्ही बाजूच्या रहिवाशांना सोसावा लागत होता. तसेच येथून जाणाऱ्या-येणाऱ्या प्रवाशांना ही नदीपात्रातील घाणीच्या वासाने जामखेड आल्याचे संकेत मिळायचे. 

हे जामखेडकरांसाठी चांगले नव्हतेच मुळी

आमदार रोहित पवारांनी पुढाकार घेतला आणि नदीच्या खोलीकरण, रुंदीकरण व शुशोभिकरणाचा 'प्रस्ताव' हाती घेऊन 'सकाळ रिलीफ फंड' व इतर विविध संस्थांच्या माध्यमातून गाळ काढण्याच्या कामाचा शुभारंभ केला. यावेळी बारामती डेव्हलपमेंट ट्रस्टच्या विश्वस्त तथा आमदार रोहित पवारांच्या मातोश्री सुनंदा पवार यांनी हजेरी लावली. कामाने वेग घेतला आणि बघता बघता

विंचरणा नदीचे अरुंद झालेले पात्र पुन्हा विस्तारले. पात्राच्या परिसरातील खुरटी झुडप,
साचलेला गाळ निघाला. विंचरणेचा गुदमरलेला श्वास मोकळा झाला. 

विंचरणा नदी गाळमुक्त झाली. मात्र शुशोभित करण्याकरिता 'कन्सल्टंट' नेमून नदी वृक्ष लागवड करावी. पात्रालगत बाग उभी करुन बाग नसलेले शहरही जामखेडची निर्माण झालेली ओळख पुसण्याचे काम करावे, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.

विंचरणेचा इतिहास
बीड जिल्हातील चिखली (नाथ) येथे उगमस्थान असलेली विंचरणा नदी डोंगर दर्याच्या कुशीतून मार्ग शोधत मोठ्या अवेषाने श्री क्षेत्र रामेश्वर (सौताडा) येथे उंच कड्यावरुन स्वत: ला दरीतून झोकून देत भुतवडा तलावात येऊन विसावते.  पन्नास वर्षापासून जामखेडकरांच्या पिण्याच्या पाण्याची तहान याच भुतवडा तलावातून भागवली जाते भागवते. जामखेड करांसाठी विंचरणा नदी आणि भुतवडा तलाव वरदान ठरलेले आहेत. दरवर्षी पावसाळ्याच्या तोंडावरच भुतवडा तलाव पूर्ण क्षमतेने भरताने ओसंडून वाहतो. मात्र वाहणाऱ्या विंचरणा नदीला येथून पुढे जामखेड शहरातून जाताना (वहाताना) मोठ्या अडचणीचा सामना करावा लागतो. जामखेडच्या कार्यक्षेत्रामध्ये विंचरणा स्वतः चे अस्तित्व हरवून बसली होती. पात्रात मोठ्या प्रमाणात गाळ साचला होता. नदीपात्राचा दुतर्फा खुरटी झुडप वाढली होती. हे आमदार रोहित पवारांचा लक्षात आले आणि त्यांनी विंचरणेचे रुप पालटण्यासाठी पुढाकार घेतला.

यांची घेतली मदत
'सकाळ' रिलीफ फंड, कर्जत जामखेड इंटिग्रेटेड डेव्हलपमेंट फाऊंडेशन, बारामती अँग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट, भारतीय जैन संघटनेच्या संयुक्त विद्यमाने आमदार रोहित पवारांच्या पुढाकारातुन विंचरणा नदी 'गाळमुक्त व सुशोभीकरणाचा' शुभारंभ करण्यात आला. नदी पुनरुज्जीवन प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात गाळ व कचरा काढणे, दुसऱ्या टप्प्यात रस्ता व झाडांची लागवड व तिसऱ्या टप्प्यात सुशोभीकरण करण्यात येणार आहे.

संपादन : अशोक मुरुमकर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com