Ahmednagar ST Stand : हुश्‍श ! बसस्थानके होणार सुंदर; राज्यात मिळणार दोन कोटींची बक्षिसे

एसटीचे स्वच्छता अभियान; शहराशी ग्रामीण भागाची नाळ जोडण्यासाठी एसटीने वर्षानुवर्षे महत्त्वाची भूमिका बजावली
Cleanliness Campaign of ST msrtc prizes worth two crores travel ahmednagar
Cleanliness Campaign of ST msrtc prizes worth two crores travel ahmednagarsakal

अहमदनगर : एसटी बसस्थानक म्हटले, की स्वच्छतेचा प्रश्न कायम समोर येतो. निधीची अडचण, मनुष्यबळाचा अभाव, अशी अनेक कारणे. रोज हजारो प्रवासी ये-जा करत असलेली ही स्थानके स्वच्छ व सुंदर करण्याचा निर्णय महामंडळाने घेतला आहे. त्यानुसार स्वच्छता अभियान राबविण्याचे ठरले आहे.

राज्यातील स्थानकांना दोन कोटींची बक्षिसेही मिळणार आहेत. त्यामुळे आगामी काळात ही स्थानके सुंदर दिसणार आहेत. शहराशी ग्रामीण भागाची नाळ जोडण्यासाठी एसटीने वर्षानुवर्षे महत्त्वाची भूमिका बजावली. मध्यमवर्गीय, गरीब जनतेला एसटीशिवाय पर्याय नाही. अनेक गर्भश्रीमंत मंडळीही लांबच्या प्रवासाकरिता एसटीला पसंती देतात.

या पार्श्वभूमीवर बहुतेक ठिकाणची बसस्थानके जुनी आहेत. महामंडळाकडे एसटी बसची संख्याही कमी आहे, तर कर्मचाऱ्यांचीही अडचण आहे. साहजिकच, एसटीपुढे अनेक प्रश्न उभे असतात. त्यातून मार्ग काढत एसटीची चाके सतत गरगरत आहेत. महाराष्ट्राच्या विकासाला चालना देत आहेत.

मुख्यमंत्री, तसेच महामंडळाच्या संचालक मंडळाने सर्व स्थानके स्वच्छ करण्याबाबत निर्णय घेतला. त्यानुसार काही निर्देश देण्यात आले आहेत. स्वच्छता अभियानाचा कृतिआराखडा तयार करण्यात आला आहे.

Cleanliness Campaign of ST msrtc prizes worth two crores travel ahmednagar
Ahmednagar : तेरा गावांमधील शेतकरी आक्रमक, प्रशासन नरमले; ग्रामस्थांमुळे वाळू डेपो निविदा स्थगित

याचा कालावधी एक वर्षाचा असेल. राज्यात महामंडळाची ५८० पेक्षा जास्त स्थानके आहेत. सर्वच स्थानके या स्पर्धेत सहभागी होणार आहेत. बसस्थानकाची वर्गवारी करण्यात आली आहे. शहरातील ‘अ’, निमशहरी ‘ब’ आणि ग्रामीण भागातील बसस्थानके ‘क’ वर्गात आहेत. राज्यातील महामंडळाचे मुंबई, पुणे, नाशिक, संभाजीनगर, अमरावती, नागपूर असे सहा प्रादेशिक विभाग आहेत.

ही स्पर्धा दोन टप्प्यांत होईल. राज्यात दोन कोटींपेक्षा जास्त रकमेची बक्षिसे दिली जाणार आहेत. पहिल्या टप्प्यात अ, ब, क अशा वर्गवारीनुसार स्पर्धा होईल. दुसऱ्या टप्प्यात प्रादेशिक गटांमध्ये पहिल्या आलेल्या बसस्थानकांमध्ये स्पर्धा रंगेल. अंतिम तीन बसस्थानकांना बक्षिसाची रक्कम दिली जाईल.

Cleanliness Campaign of ST msrtc prizes worth two crores travel ahmednagar
Ahmednagar : महावितरणने फोडला जनतेला घाम; नागरिक त्रस्त

स्पर्धेसाठी परीक्षक नियुक्त केले असून, दर दोन महिन्यांनी प्रत्येक बसस्थानकाचे परीक्षण करण्यात येईल. यामध्ये स्थानक परिसर, स्वच्छतागृहे, सुशोभीकरण, कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी, प्रवाशांसोबत सौहार्दाचे वागणे, वक्तशीरपणा अशा विविध घटकांचा यात समावेश असेल. बहुतेक कामे लोकसहभागातून होणे अपेक्षित आहे. त्यासाठी स्वयंसेवी संस्था, दानशूर व्यक्तींकडून निधीची उपलब्धता, महिला बचतगट, तरुण मंडळे आदींची मदत घेण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

अशी असतील बक्षिसे

  • अ वर्ग प्रथम ५० लाख, चषक व प्रशस्तिपत्रक

  • ब वर्ग प्रथम २५ लाख, चषक व प्रशस्तिपत्रक

  • क वर्ग प्रथम १० लाख, चषक व प्रशस्तिपत्रक

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com