शेतकरी आंदोलनाला पाठिंब्यासाठी निघोजमध्ये बंद

अनिल चौधरी
Tuesday, 8 December 2020

या आंदोलनाला शेतकर्यांसह ग्रामस्थांचा ऊत्फुर्त पांठीबा मिळाला. कृषी कायदे मागे घेण्यासाठी निघोज येथे पोलिस उपनिरीक्षक विजयकुमार बोञे व पो.हे.काॕ.अशोक निकम यांना निवेदन देवुन ते वरिष्ठ पातळीवर पोहचवण्याचे आवाहन केले.

निघोज : केंद्र सरकारने तयार केलेले कायदे मागे घेण्यासाठी दिल्लीत सुरु असलेल्या आंदोलनाला पाठींबा देण्यासाठी निघोज व परीसरातील बाजारपेठ बंद ठेवुन शेतकरी रस्त्यावर उतरले.

या आंदोलनाला शेतकर्यांसह ग्रामस्थांचा ऊत्फुर्त पांठीबा मिळाला. कृषी कायदे मागे घेण्यासाठी निघोज येथे पोलिस उपनिरीक्षक विजयकुमार बोञे व पो.हे.काॕ.अशोक निकम यांना निवेदन देवुन ते वरिष्ठ पातळीवर पोहचवण्याचे आवाहन केले.

दिल्ली सीमेवर आंदोलक शेतकरी व केंद्र सरकार यांच्यामध्ये संघर्ष चालु आहे.शेतकऱ्यांची नवीन कृषी कायदे मागे घेण्याची मागणी मंजुर करावी यासाठी निघोज येथील शिवबा संघटना, प्रहार संघटना,संदिप पाटील फाउंडेशन, ग्रुप ग्रामपंचायत निघोज, निघोज ग्रामस्थ यांनी बंदला शंभर टक्के पाठिंबा देवुन पुर्ण व्यवहार बंद ठेवले.

या वेळी शिवबा संघटनेचे अध्यक्ष अनिल शेटे, संदिप पाटील फाउंडेशनचे अध्यक्ष सचिन वराळ, मळगंगा ट्रस्टचे सचिव शांताराम कळसकर, विश्वस्त ज्ञानदेव लंके , माजी उपसरपंच उमेश सोनवणे, प्रा.ज्ञानेश्वर कवाद, विश्वास शेटे, संकेत लाळगे, राजु लाळगे, भगवान लामखडे, रोहिदास लामखडे, दत्ताञय कवाद, अमोल ठुबे, शंकर वरखडे ,मच्छिंद्र लामखडे, महेश ढवळे आदी शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. अहमदनगर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Closed in Nighoj to support the farmers' movement