
-सुनील राऊत
नातेपुते : मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्या विशेष संकल्पनेमधून या वर्षीपासून पंढरपूर येथील आषाढी वारीसाठी राज्यातून येणाऱ्या पहिल्या १५ मानाच्या पालख्यांमधील वारकरी बंधूंची चरणसेवा हा उपक्रम अतिशय प्रभावीपणे राबविला जात आहे, अशी माहिती या उपक्रमाच्या संयोजिका डॉ. पूनम राऊत यांनी ‘सकाळ’शी बोलताना दिली.