
राहाता: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राला विकासाच्या शिखरावर नेले. जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि व युवानेते डॉ. सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शिर्डी विधानसभा मतदारसंघातून विक्रमी रक्तदान करण्याचा संकल्प करण्यात आला. हा संकल्प पूर्ण करून मुख्यमंत्र्यांना वाढदिवसाची भेट द्यायची आहे, असे प्रतिपादन रणरागिनी महिला मंडळाच्या अध्यक्ष धनश्री विखे पाटील यांनी केले.