कोरोनावर 'हे' औषध ठरेल गेमचेंजर! 5 ते 7 दिवसांत निगेटिव्ह, डॉक्टर दाम्पत्याचा दावा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

dr chhajed couple

कोरोनावर 'हे' औषध ठरेल गेमचेंजर! डॉक्टर दाम्पत्याचा दावा

शिर्डी (जि.अहमदनगर) : कोविड रुग्णांवरील (coronavirus) उपचारासाठी हे प्रभावी हत्यार म्हणून हे औषध अमेरिकेप्रमाणे आपल्याकडेही गेमचेंजर ठरेल. यात सत्तर टक्के रुग्णांची कोविड चाचणी पाच ते सात दिवसांत निगेटिव्ह येते. या उपचाराचे उत्साहवर्धक निष्कर्ष पुढे येत आहेत, अशी माहिती कोविड रुग्णांसाठी मोफत मेडिको हेल्पलाईन चालविणारे पुणे येथील डाॅ. गौतम छाजेड व त्यांच्या पत्नी डाॅ. मनीषा यांनी ‘सकाळ’शी बोलताना दिली. ( cocktail-antibodies-Effective-on-covid-marathi-news-jpd93)

हा डाटाबेस स्टडी कोविड रुग्णांवरील उपचारांसाठी मार्गदर्शक ठरणारा

कोविड रुग्णांवरील (coronavirus) उपचारासाठी काॅकटेल अँटिबॉडीज (cocktail antibodies) हे प्रभावी हत्यार म्हणून पुढे आले आहे. हे औषध अमेरिकेप्रमाणे आपल्याकडेही गेमचेंजर ठरेल. अशी दावा डॉ. छाजेड दाम्पत्यानी केला. प्रत्येक रुग्णावरील औषधोपचार व मिळालेला प्रतिसाद, याची तपशीलवार माहिती डाॅ. छाजेड यांनी संकलीत केली आहे. त्याचे विश्‍लेषण देखील केले. हा डाटाबेस स्टडी कोविड रुग्णांवरील यापुढच्या उपचारांसाठी मार्गदर्शक ठरणारा आहे. सुमारे वीस हजार रुग्ण घरीच औषधे घेऊन बरे झालेत. डाॅ. मनीषा या राहाता येथील भाजप नेते डाॅ. राजेंद्र पिपाडा यांच्या भगीनी आहेत.

हेही वाचा: अहमदनगर : कन्येने बांधली 60 वर्षीय पित्याची लग्नगाठ!

अवघ्या एका दिवसात संसर्ग पातळी मूळ पदावर आली.

डाॅ. गौतम छाजेड म्हणाले, ‘‘माझी पत्नी डाॅ. मनीषा हिला मागील पंधरवाड्यात कोविड संसर्ग झाला. काॅकटेल अँटिबॉडिज उपचार दिल्यानंतर अवघ्या एका दिवसात संसर्ग पातळी मूळ पदावर आली. केईएम रुग्णालयात व्हेंटिलेटरवरील कोविड रुग्णावर हा उपचार केल्याने तो दीड दिवसात अतिदक्षता विभागातून बाहेर आला. या औषधाचे उत्पादन सुरू झाले आहे. ते बाजारात पुरेशा प्रमाणात उपलब्धही आहे. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प याच उपचाराने एका दिवसात कोविड संसर्गातून बाहेर आले. तेथे त्याची किंमत पाच ते सात लाख रुपये, तर आपल्याकडे साठ हजार रुपये आहे. या उपचारामुळे मृत्यूदर कमी होईल. स्टेरॉईड व अन्य उपचारांमुळे होणारे साईडइफेक्ट तसेच म्युकरमायकोसिस सारखे जीवघेणे आजार टळतील.’’ छाजेड दाम्पत्याच्या मोफत मेडिको हेल्पलाईनचा राज्यभरातील ३५ हजारांहून अधिक रुग्णांनी लाभ घेतला. पुण्यातील नामवंत रुग्णालयांतील दीडशेहून अधिक डाॅक्टर या हेल्पलाईन सोबत जोडले गेले आहेत.

तज्ज्ञांचा कयास

कोविड होऊन बरे झालेल्या रुग्णांची मोठी संख्या व कोविड लसीकरणाचे काॅकटेल (हर्ड इम्युनिटी) व मोनोक्लोनल अँटिबॉडिजच्या काॅकटेलमुळे (काॅकटेल अँटिबॉडिज) कोविडची तिसरी लाट येईल, असे वाटत नाही. दुसरी लाट काही दिवल लांबेल. तिसरी लाट आलीच, तरी ती मोठी नसेल, असा तज्ज्ञांचा कयास आहे. आमचेही असेच निरीक्षण आहे.

सकाळ ने आमच्या मोफत कोविड मेडिको हेल्पलाईनचे वृत्त प्रसिध्द केले. राज्यभरातील विवीध स्वयंसेवी संस्था व माध्यमांनी या वृत्ताची दखल घेतली. नगर जिल्ह्यातील आमदार रोहित पवार यांनी फोन करून आमच्या कामकाजाची माहीती घेतली. आवश्यक ते सहकार्य करण्याची तयारी दर्शविली. ट्विटरद्वारे समाधानही व्यक्त केले. हेल्पलाईन क्र.9373312667 - डाॅ. गौतम छाजेड

हेही वाचा: अबब...चक्क पंचायत समितीत शिरला बिबट्या!

Web Title: Cocktail Antibodies Effective On Covid Marathi News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Coronavirusdoctor