अबब...चक्क पंचायत समितीत शिरला बिबट्या!

leopard in panchayat samiti
leopard in panchayat samitiesakal

अकोले (जि.अहमदनगर) : तालुक्यातील अनेक गावांत, शेतांमध्ये बिबट्या (leapord) आलेला पाहिला आहे. काही दिवसांपूर्वी धुमाळवाडीत (dhumalwadi) बिबट्याने माणूस खाल्ल्याची घटना ताजी असताना, आता बिबट्या चक्क अकोले शहरात, तेही पंचायत समितीच्या पोर्चमध्ये वावरताना पाहायला मिळाला. (Akole-Panchayat-Samiti)

शहरात घबराट

याबाबत समजलेली माहिती अशी - गुरुवारी (ता.२९) मध्यरात्री अकोले शहरातील पोलिस ठाणे व वन विभागाच्या कार्यालयाजवळ असलेल्या पंचायत समितीच्या इमारतीत मांजराची शिकार करण्यासाठी मांजरामागे बिबट्या घुसला. या वेळी तो पंचायत समिती इमारतीच्या पोर्चमध्ये मुक्तपणे फिरताना त्याचा व्हिडिओ स्थानिक कर्मचाऱ्याने आपल्या मोबाईलमध्ये बनवला. या व्हिडिओमध्ये बिबट्या पोर्चमध्ये बिनधास्तपणे संचार करताना दिसत आहे. यावरून बिबट्या आता शेतांसह शहरातही वावरताना दिसत आहे. त्यामुळे शहरात घबराट निर्माण झाली आहे. नागरिक भयभीत झाले आहेत.

leopard in panchayat samiti
अहमदनगर : कन्येने बांधली 60 वर्षीय पित्याची लग्नगाठ!

वन्यप्राणी मानवी वस्तीकडे येण्याचे कारण काय?

दिवसेंदिवस शहरीकरण झपाट्याने होत आहे. त्यामुळे या वन्यप्राण्यांचा मूळ अधिवास नष्ट होत आहे. त्यामुळे ते शेतातील दाट पिकांमध्ये वास्तव्य करीत आहेत. अशी शेती मानवी वस्तीलगतही असते. त्यामुळे बिबटे मानवी वस्तीकडे येत असल्याचे दिसून येते.

वन्यप्राणी व मानवातील संघर्ष कसा टाळता येईल?

जंगले तसेच पाण्यांचे स्त्रोतही कमी होत आहेत. त्यामुळे वन्यप्राणी अन्न आणि पाण्याच्या शोधात मानवी वस्तीकडे येतात. अशावेळी त्यांना त्रास न देता त्यांना अन्न आणि पाणी उपलब्ध करून द्यावे. विकासाचा अतिरेक थांबविला पाहिजे.

प्राण्यांपासून बचाव कसा करावा?

शहरात बिबट्या दिसल्यास गोंगाट किंवा गर्दी न करता त्याला निघून जाण्यासाठी रस्ता मोकळा करून द्यावा. त्रास न दिल्यास तो हल्ला करीत नाही.

leopard in panchayat samiti
अहमदनगर : बिग बाजारवर 'कारवाई'चा डबल धमाका!
leopard in panchayat samiti
अहमदनगर : कन्येने बांधली 60 वर्षीय पित्याची लग्नगाठ!

वन्यप्राण्यांना त्रास न देणे हेच त्यांच्या आणि मानवाच्याही हिताचे!

वन्यप्राण्याला जेरबंद करणे किंवा तो कोठे अडकला असल्यास त्याची सुटका करणे आदी कामे या पथकाकडून केली जातात. त्यासाठी जाळी, रेस्क्यू व्हॅन यासह प्राथमिक उपचाराची पेटी या पथकाकडे असते. त्यामुळे वन्यप्राणी जखमी असल्यास तत्काळ उपचार करता येतात. या पथकास स्थानिक कर्मचारीही मदत करतात. संबंधितांकडून माहिती मिळाल्यानंतर संबंधित पथक मदत कार्य करते.आपल्या जिवास धोका असल्याचे जाणवल्यावर वन्यप्राणी हल्ला करतात. बिबट्या आपल्यापेक्षा जास्त उंचीच्या प्राण्यांवर हल्ला करीत नाही. मात्र गर्दी आणि गोंगाटामुळे तो बिथरतो. भीतीमुळे त्याच्याकडून हल्ला केला जातो. त्यामुळे त्याला त्रास देऊ नये.वन्यप्राण्यांना त्यांच्या मूळ अधिवासात राहू देणे आवश्यक आहे. त्यांना त्रास न देणे हेच त्यांच्या आणि मानवाच्याही हिताचे आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com