
पारनेर तालुक्यातील 88 ग्रामपंचायतीच्या निवडणुका राज्य निवडणुक आयोगाच्या आदेशानुसार जाहीर झाल्या आहेत.
पारनेर (अहमदनगर) : तालुक्यातील 88 ग्रामपंचायतीच्या निवडणुका राज्य निवडणुक आयोगाच्या आदेशानुसार जाहीर झाल्या आहेत. निवडणुका होणार असलेल्या ग्रामपंचायतींची संख्या तालुक्यातील ग्रामपंचायतींच्या संखेच्या 50 टक्यापेक्षा अधिक असल्याने तालुक्यात पारनेर नगर पंचायतीसह संपुर्ण तालुक्यात अचारसंहीता लागू करण्यात आली आहे.
मतदान शुक्रवारी 15 जानेवारीस होत आहे. त्यामुळे तालुक्यात निवडणुक कार्यक्रम जाहीर झाल्यापासुन निकाल जाहिर होईपर्यंत आचारसंहिता लागु राहील, अशी माहिती तहसीलदार ज्योती देवरे यांनी दिली.
नगर जिल्ह्यातील बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
या कालावधीत तालुक्यात मतदारांवर विपरीत प्रभाव टाकणारी कोणतीही कृती, घोषणा मंत्री, खासदार, आमदार व संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थेतील पदाधिकारी यांना करता येणार नाही. कोणत्याही वित्तीय अनुदानाची घोषणा, कोनशिला बसविणे, नवीन रस्ते बांधणे अशी कामे करू नयेत. मतदारास आर्थिक किंवा अन्य प्रकारचे कोणतेही प्रलोभन दाखविण्यात येऊ नये व कोणत्याही वस्तुंचे वाटप करू नये. यात ऑनलाईन खरेदीचा देखील समावेश आहे.
अचारसंहिता काळात मतदारांच्या जातीय व धार्मिक भावनांना आवाहन करू नये. वैमनस्य वाढेल किंवा व तणाव निर्माण होईल, अशी कोणतीही कृती करू नये. निवडणुक प्रचार भाषणे, फलक यासाठी प्रार्थनास्थळांचा वापरकरू नये, लाच देणे, मतदारावर अवाजवी प्रभाव टाकणे, धाकदपटशा दाखविणे, खोट्या नावाने मतदान करणे, मतदारांनामतदान कक्षापर्यंत पोहचविणे व तेथुन परत नेणे यासारख्या भ्रष्ट प्रथा किंवा निवडणुकविषयक अपराध करण्यास बंदी घालण्यात आली आहे.
कोणत्याही व्यक्तीची जमिन, इमारत, भिंत याचा वापर मालकांच्या संमत्ती शिवाय करू नये, आवाजाची पातळी ऱाखण्याची व ध्वनी प्रदुषणाचेही नियम काटोकोरपणे पाळावेत, असे अवाहन तहसीलदार दोवरे यांनी केले आहे. निवडणुकीच्या काळात मद्याचे वाटप करण्यात येऊ नये. सर्वांनीच आचारसंहितेची अंमलबजावणी योग्यरितीने पाळावी अऩ्यथा आचारसंहितेचा भंग झाल्यास नियमानुसार कार्यवाही करणेत येईल, असे तहसीलदार देवरे यांनी जाहीर केले आहे.
संपादन : अशोक मुरुमकर