पुण्यातील विद्यार्थी सहाय्य समितीच्या वतीने नगर जिल्ह्यात वृक्षारोपणाचा प्रारंभ

सुनील गर्जे
Tuesday, 8 September 2020

संत ज्ञानेश्वर महाराजांनी ज्या नगरीतून सातशेवर्षांपूर्वी 'महावने लावावी नानाविध' हा संदेश दिला त्याच नेवाशातून विद्यार्थी सहाय्य समितीच्या वृक्षारोपण उपक्रमाचा शुभारंभ झाल्याने हे महत्वाचे आहे.

नेवासे (अहमदनगर) : संत ज्ञानेश्वर महाराजांनी ज्या नगरीतून सातशेवर्षांपूर्वी 'महावने लावावी नानाविध' हा संदेश दिला त्याच नेवाशातून विद्यार्थी सहाय्य समितीच्या वृक्षारोपण उपक्रमाचा शुभारंभ झाल्याने हे महत्वाचे आहे. वृक्षारोपणाने निसर्ग समृद्ध होतो. निसर्ग सुखावण्या कारिता वृक्षारोपण काळाची गरज आहे, असे  प्रतिपादन महाराष्ट्र वारकारी महामंडळाचे जिल्हाध्यक्ष हभप नंदकिशोर महाराज खरात यांनी केले.

पुणे येथील विद्यार्थी सहाय्य समितीच्या 'लक्ष एक हजार वृक्षारोपण व जतन' या उपक्रमाचा नेवासे-शेवगाव तालुक्यात वृक्ष व सुरक्षा जाळीचे वाटपाचा शुभारंभ नेवासे येथील खरात महाराज, नगर पंचायतचे उपनगराध्यक्ष नंदकुमार पाटील यांच्या हस्ते झाला. त्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी प्रा. डॉ. किशोर धनवटे, प्रा. सुनील गर्जे उपस्थित होते.

हेही वाचा : घंटागाडीची उंची वाढली; कचरा टाकण्यासाठी महिलांना शोधला ‘असा’ पर्याय
नंदकुमार पाटील म्हणाले, विद्यार्थी सहाय्य समितीचा हा उपक्रम निसर्ग व समाजाच्या हिताचा आहे. विद्यार्थी दशेत घेतलेला हा सामाजिक वसा नक्कीच प्रेरणादायी आहे. यावेळी डॉ. किशोर धनवटे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी पुणे येथे शिक्षण घेत असलेले नेवाशातील विद्यार्थ्यांना शंभर वृक्ष व सुरक्षा जाळयांचे वाटप उपस्थितांच्या हस्ते करण्यात आले. प्रास्ताविक प्रा. डॉ. दिनकर आवारे यांनी तर स्वागत प्रणाली चक्रानारायण यांनी केले. यावेळी विद्यार्थी सहाय्य समितीचे सदस्य ऊजेफ शेख, सौरभ खुळे, प्रज्ञा ढोकणे, शुभम डोईफोडे, अनिकेत फुलारी, अभिषेक कुटे, अक्षय कदम, प्रदीप शेंडगे उपस्थित होते.

उद्योगपती भंवरलाल सुथार यांची मदत
पुणे येथील विद्यार्थी सहाय्य समितीच्या माध्यमातून मुंबई येथील उद्योगपती भंवरलाल सुथार यांच्या दोन लाख दहा हजार रुपयांच्या देणगीतून नेवासे, शेवगाव, कोपरगाव, राहता, संगमनेर तालुक्यातील समिती सदस्य विद्यार्थ्याच्या गावी वृक्ष व सुरक्षा जाळ्या देण्यात आल्या आहेत. विद्यार्थ्यांकडून वृक्षारोपण व जतन करण्यात  येणार आहे. 

संपादन : अशोक मुरुमकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Commencement of tree planting in Nagar district on behalf of Student Committee Pune