
संगमनेर : येथील बसस्थानक परिसरातील मोकळ्या जागेत तिथीनुसार शिवजयंती साजरी करण्यासाठी व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मंदिराची आरास उभारण्यासाठी परवानगी मिळावी, या मागणीसाठी शिवजन्मोत्सव सोहळा समिती स्वाभिमानी संगमनेर शहर व तालुका पदाधिकाऱ्यांनी मंगळवारी रात्री आठ वाजता येथील यशवंतराव चव्हाण मध्यवर्ती प्रशासकीय भवनात घोषणाबाजी करत ठिय्या दिला. आम्हाला कोणत्याही परिस्थितीत निर्णय द्या, या मागणीवर आंदोलक ठाम होते; प्रशासन काय निर्णय घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.