श्रीरामपूरची बाजार समिती काटा मारते, शेतकऱ्याची तक्रार

गौरव साळुंके
Thursday, 24 September 2020

सदर प्रकारामुळे परिसरात मोठा खळबळ उडाल्याने काल रात्री वजनमापे नोंदणी विभागाने बाजार समितीचा भूईकाटा व आडते व्यापार्यांचा वजन काटा तपासणी केली.

श्रीरामपूर ः येथील बाजार समितीच्या टाकळीभान उपबाजारातील 50 टन क्षमतेच्या वजनकाट्यात तफावत अाली. तशी तक्रार एका शेतकर्यांने काल केली. त्यानंतर वजनमापे नोंदणी विभाग व सहाय्यक निबंधक यांनी भेट देवुन काटाची तपासणी केली.  

खिर्डी येथील सेवा संस्थेचे अध्यक्ष शनैश्वर पवार यांनी काल सोयाबीन ट्रॅक्टरमध्ये टाकळीभान उपबाजारात विक्रिसाठी आणले होते. बाजार समितीच्या 50 टनी वजनकाट्यावर ते 1 टन 670 किलो भरले. त्यावेळी पवार त्यांना वजन कमी भरल्याची शंका व्यक्त आली.

त्यांनी सदर सोयाबीन व्यापाऱ्याच्या वजन काट्यावर मोजले तेव्हा 1 टन 908 किलो वजन भरले. त्यामुळे बाजार समिती व व्यापार्यांच्या वजन काट्यात 238 किलोची तफावत आढळुन आल्याचे समोर आले.

सदर प्रकारामुळे परिसरात मोठा खळबळ उडाल्याने काल रात्री वजनमापे नोंदणी विभागाने बाजार समितीचा भूईकाटा व आडते व्यापार्यांचा वजन काटा तपासणी केली.

आज सहाय्यक निबंधक विजयसिंह लकवाल यांनी भेट देवुन माहिती घेतली. त्यांनीही काटा प्रकरणाला क्लिनचिट दिली आहे. बाजार समितीच्या काट्यावर सदर शेतकर्यांचे सोयाबीन 238 किलो कमी भरल्याची तफावत शोधण्यात संबधित विभागाला अपयश आल्याने शेतकरी वर्गातून संताप व्यक्त केला जात आहे.

संपादन -अशोक निंबाळकर
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Complaint about Shrirampur Market Committee