पुणे पोलिस आयुक्तांकडे नव्याने आलेल्या बहिरट यांची तक्रार

गौरव साळुंके
Wednesday, 4 November 2020

श्रीरामपूर येथील शहर पोलिस ठाण्याचे तत्कालीन पोलिस निरिक्षक श्रीहरी बहिरट यांची तक्रार डॉ. विजय मकासरे यांनी पुणे पोलिस आयुक्तांकडे केली आहे. पोलिस निरीक्षक बहीरट यांची काही दिवसांपुर्वी येथून पुणे शहर पोलिस विभागात बदली झाली होती.

श्रीरामपूर (अहमदनगर) : येथील शहर पोलिस ठाण्याचे तत्कालीन पोलिस निरिक्षक श्रीहरी बहिरट यांची तक्रार डॉ. विजय मकासरे यांनी पुणे पोलिस आयुक्तांकडे केली आहे. पोलिस निरीक्षक बहीरट यांची काही दिवसांपुर्वी येथून पुणे शहर पोलिस विभागात बदली झाली होती.

शहर पोलिस ठाणे हद्दीत निरीक्षक बहीरट यांनी केलेल्या विविध कारवाई वादग्रस्त ठरल्या असुन अधिकाराचा गैरवापर करुन खोटे गुन्हे दाखल केल्याचा आरोप डॉ. मकासरे यांनी निवेदनाद्वारे उपस्थित केला आहे. या संदर्भात डॉ. मकासरे यांनी उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली असुन निरिक्षक बहिरट यांच्या कारकीर्दीत टिळकनगर पोलिस चौकीसमोर एका तरुणाने पेट्रोल टाकुन पेटुन घेत आत्महत्या केली. तसेच तालुक्यातील एकलहरे येथील लोखो रुपयांच्या अवैध गुटखा प्रकरणातील मुख्य आरोपींना निरीक्षक बहिरट यांनी बाजुला ठेवुन आर्थिक गैरव्यवहार केल्याचा आरोप डाॅ. मकासरे यांनी केला आहे.

अवैध गुटखा प्रकरणाच्या चौकशीसाठी पोलिस महानिरीक्षक डॉ. प्रताप दिघावकर यांच्याकडे तक्रार केल्यानंतर निरिक्षक बहिरट यांच्याकडुन गुटखा प्रकरणाचा तपास काढल्याच्या रागातुन आपल्यावर खोटा गुन्हा दाखल केला. आपल्यावरील दोन्ही गुन्हयांचे सीसीटिव्ही फुटेज आपल्याडे असुन व्हिडीओ फुटेजनुसार सदर गुन्हे खोटे असल्याचे डाॅ. मकासरे यांनी निवेदनात स्पष्ट केले आहे. त्यामुळे निरीक्षक बहीरट मानसिकदृष्टया कमकुवत असुन वैयक्तिक द्वेषातून खोटे गुन्हे दाखल करीत असल्याचा सवाल डाॅ. मकासरे यांनी निवेदनाद्वारे उपस्थित केला आहे. तसेच दारु बंदीच्या काळात श्रीरामपूर शहरात खुलेआम दारु विक्री सुरु ठेवली. 

तसेच लोकवर्गणीतुन पोलीस चौक्या उभारल्या प्रकरणी पारनेर येथील कार्यकर्त्यांनी औरंगाबाद खंडपीठात निरिक्षक बहिरट यांच्या विरोधात याचिका दाखल केली आहे. सदर पोलीस चौकी उभारण्यासाठी दारु निर्मिती कंपन्यांकडुन अर्थिक मदत घेतल्यामुळे वादग्रस्त ठरलेल्या पोलीस निरीक्षक बहिरट यांना कामासाठी कुठलेही पोलीस ठाणे देवु नये. अशी मागणी डाॅ. मकासरे यांनी निवेदनाद्वारे केली आहे.

दरम्यान, एकलहरे येथील अवैध गुटखा प्रकरणाचा तपास प्रक्रिया सध्या तपास थंडावली असुन याप्रकरणी गृह खात्याने पोलिस निरिक्षक श्रीहरी बहिरट, पोलिस उपाधिक्षक राहुल मदने यांच्यासह पोलिस शिपाई जालिंदर लोंढे यांच्या मोबाईल कॉल डिटेल्सचा (CDR,REPORT) अहवाल काढण्याची मागणी डॉ. मकासरे यांनी केली आहे.

संपादन : अशोक मुरुमकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Complaint of newly arrived Bhairat to Pune Police Commissioner