esakal | नगर जिल्ह्यात काँग्रेसचे आंदोलन; महाविकास आघाडीकडे ठेकेदारावर कारवाई करण्याची मागणी
sakal

बोलून बातमी शोधा

Congress demands action against contractor protesting in Nagar district

मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून करण्यात आलेल्या रस्ता कामातील अनियमितता व गैरव्यहवारासंदर्भात राज्य गुणवत्ता निरीक्षकांकडून तपासणी अहवाल प्राप्त झाल्यावर दोषी आढळणाऱ्या संबंधितांवर कारवाई करण्याचे महाराष्ट्र ग्रामीण रस्ते विकास संस्थेच्या कार्यकारी आधिकार्‍याने दिलेल्या आश्वासनानंतर नेवासे काँग्रेस कमिटीने धरणे व उपोषण स्थगित केले.

नगर जिल्ह्यात काँग्रेसचे आंदोलन; महाविकास आघाडीकडे ठेकेदारावर कारवाई करण्याची मागणी

sakal_logo
By
सुनिल गर्जे

नेवासे (अहमदनगर) : मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून करण्यात आलेल्या रस्ता कामातील अनियमितता व गैरव्यहवारासंदर्भात राज्य गुणवत्ता निरीक्षकांकडून तपासणी अहवाल प्राप्त झाल्यावर दोषी आढळणाऱ्या संबंधितांवर कारवाई करण्याचे महाराष्ट्र ग्रामीण रस्ते विकास संस्थेच्या कार्यकारी आधिकार्‍याने दिलेल्या आश्वासनानंतर नेवासे काँग्रेस कमिटीने धरणे व उपोषण स्थगित केले. 

महाराष्ट्र ग्रामीण रस्ते विकास संस्थेच्या नगर येथील कार्यालयासमोर नेवासे काँग्रेस तालुकाध्यक्ष संभाजी माळवदे, प्रवीण तिरोडकर यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस कार्यकर्त्यांनी नेवासे तालुक्यात मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या माध्यमातून झालेल्या नेवासे (संत ज्ञानेश्वर मंदिर) ते शनिशिंगणापूर या दोन देवस्थानांना जोडणारा रस्ता. तसेच वडाळे बहिरोबा ते म्हाळसपिंपळगाव- कौठा रस्ता. या दोन रस्त्यांच्या कामांची चौकशी होऊन संबंधितांवर कारवाई व्हावी, यासाठी उपोषण करण्यात आले. या दोन्ही रस्त्यांच्या ठेकेदारांनी मंजूर अंदाजपत्रक, प्लॅन- इस्टिमेटप्रमाणे या रस्त्यांचे काम न करता मनमानीपणाने उरकल्याने अत्यंत निकृष्ठ दर्जाचे झाल्याचा आरोप आंदोलकांकडून करण्यात आला आहे.

दरम्यान महाराष्ट्र ग्रामीण रस्ते विकास संस्थेचे कार्यकारी अधिकारी ह. नि. सानप यांनी संबंधितांबर कारवाई करण्याचे दिलेल्या आश्वासनानंतर उपोषणकर्त्यांनी उपोषण स्थगित केले. उपोषणात सुनील भोगे, सचिन बोर्डे, तन्वीर शेख, दत्तात्रय कुऱ्हाट, संदीप मोटे, कमलेश गायकवाड, रावसाहेब काळे, पांडुरंग होंडे सहभागी होते. 

देशद्रोहाचा गुन्हा दाखल व्हावा : संभाजी माळवदे
राज्यातील विद्यमान महाविकास आघाडी सरकारने गैरव्यहवारी व मुजोर ठेकेदारांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याचा निर्णय योग्य आहे. नेवासे तालुक्यातील रस्त्यांचे वाटोळे करणाऱ्या ठेकेदारांवर अशा प्रकारे गुन्हा दाखल करून त्याची अंमलबजावणी सुरू करावी अशी मागणी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष संभाजी माळवदे यांनी केली.

संपादन : अशोक मुरुमकर