काँग्रेसकडून शिवसेना व राष्ट्रवादीच्या मंत्र्याचे श्रीरामपूरमध्ये सत्कार

गौरव साळुंके
Wednesday, 25 November 2020

मंत्री शंकरराव गडाख आणि मंत्री प्राजक्त तनपुरे यांची राज्यातील महाविकास आघाडी सरकारमध्ये मंत्रीपदी निवड झाल्यानंतर प्रथमच दोघेंही मंत्री शहरात आल्यामुळे येथील काँग्रेसच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.

श्रीरामपूर (अहमदनगर) : मंत्री शंकरराव गडाख आणि मंत्री प्राजक्त तनपुरे यांची राज्यातील महाविकास आघाडी सरकारमध्ये मंत्रीपदी निवड झाल्यानंतर प्रथमच दोघेंही मंत्री शहरात आल्यामुळे येथील काँग्रेसच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. 

मंत्री गडाख म्हणाले, आमदार कानडे हे सातत्याने मतदारसंघातील विविध प्रश्न मांडतात. ते सर्व प्रश्न आपण आणि मंत्री तनपुरे सोडविण्यासाठी प्रयत्नशिल आहोत. श्रीरामपूर मतदारसंघातील जलसंधारणाच्या कामाबाबत तांत्रिक अडचणी दुर करुन आमदार कानडे यांनी मांडलेल्या विविध विकास कामे लक्ष देवुन सोडविणार असल्याचे राज्यमंत्री गडाख यांनी सांगितले. 

विजेच्या प्रश्नांबाबत उपस्थित केलेल्या अडचणी तातडीने सोडविण्यासाठी सर्वतोपरी मदत केली जाईल. तसेच श्रीरामपूर व देवळाली नगरपालिकेच्या कार्यक्षेत्रातील विकास कामांसाठी भरीव निधी उपलब्ध करुन देणार असल्याचे राज्यमंत्री तनपुरे यांनी स्पष्ट केले. तालुक्यातील हरेगाव परिसरातील बीसी नाला, पिंपळाचा सांधा, भैरवनाथ नगर येथील कामे मंजूरीसाठी मदत करण्याची मागणी गडाख यांच्याकडे केली.

तर मतदारसंघातील उच्च दाब विजकेंद्राचे काम त्वरीत सुरु व्हावे. तसेच वांजुळपोई, उक्कलगाव, घोगरगाव येथील वीज उपकेंद्राचे कामे त्वरीत मार्गी लावावे. त्यामुळे शेतकरयांना विजेच्या अडचणीला सामोरे जावे लागणार नाही. श्रीरामपूर नगरपालिकेच्या 24 कोटी आणि देवळाली नगरपालिकेच्या 10 कोटी रस्ते दुरुस्तीसाठी निधी उपलब्ध करण्याची मागणी करण्यात आली आहे.

संपादन : अशोक मुरुमकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Congress felicitates Shivsena and NCP ministers in Shrirampur