काँग्रेसच्या मंत्र्यांनी पदाधिकाऱ्यांच्या कामांना प्राधान्य द्यावे

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 5 December 2020

कॉंग्रेसच्या मंत्र्यांनी पक्षाचे पदाधिकारी जिल्हाध्यक्ष, तालुकाध्यक्ष यांच्या कामांना प्राधान्य देणे आवश्‍यक आहे. याबाबत प्रभारी या नात्याने आपण सर्व मंत्र्यांना सूचना द्याव्यात, अशी मागणी विनायक देशमुख यांनी केली. 

नगर : राज्य सरकारमध्ये सहभागी असलेल्या कॉंग्रेसच्या मंत्र्यांनी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या कामांना प्राधान्य द्यावे, अशी मागणी कॉंग्रेसचे प्रदेश सरचिटणीस व अखिल भारतीय कॉंग्रेसचे सदस्य विनायक देशमुख यांनी महाराष्ट्राचे प्रभारी एच. के. पाटील यांची भेट घेऊन केली. 

महाराष्ट्राचे प्रभारी व कर्नाटकचे आमदार एच. के. पाटील बुधवारी व गुरुवारी (ता. दोन व तीन) राज्याच्या दौऱ्यावर आले होते. त्यात आमदार पाटील यांनी पाटील यांची स्वतंत्र भेट घेऊन संघटनात्मक सुधारणांबाबत चर्चा केली. या वेळी सहप्रभारी वामसी रेड्डी, बी. एम. संदीप, संपतकुमार, आशिष दुवा उपस्थित होते. 
महाराष्ट्रात सध्या तीन पक्षांचे सरकार आहे. शिवसेना व राष्ट्रवादी कॉंग्रेस त्याचा उपयोग आक्रमकपणे करून त्यांच्या पक्षसंघटना वाढविण्यासाठी प्रयत्नशील आहेत. तुलनेने कॉंग्रेस कार्यकर्त्यांकडे व पदाधिकाऱ्यांच्या कामांकडे दुर्लक्ष केले जाते.

कॉंग्रेसच्या मंत्र्यांनी पक्षाचे पदाधिकारी जिल्हाध्यक्ष, तालुकाध्यक्ष यांच्या कामांना प्राधान्य देणे आवश्‍यक आहे. याबाबत प्रभारी या नात्याने आपण सर्व मंत्र्यांना सूचना द्याव्यात, अशी मागणी विनायक देशमुख यांनी केली. 

राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये अध्यक्षांची पदे रिक्त आहेत. त्या ठिकाणी त्वरित नियुक्‍त्या कराव्यात. जिल्हा व तालुकास्तरावर या विभागांच्या (सेलच्या) पदाधिकाऱ्यांच्या नियुक्‍त्या त्वरित कराव्यात, अशा मागण्याही देशमुख यांनी केल्या आहेत. आमदार पाटील यांनी सकारात्मक प्रतिसाद देऊन, याबाबत त्वरित कार्यवाही होईल, असे सांगितले. 
...... 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Congress ministers should give priority to the work of office bearers