esakal | काँग्रेसकडून उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन
sakal

बोलून बातमी शोधा

Congress protests Uttar Pradesh Chief Minister in Karjat

उत्तरप्रदेश येथील हाथरसमधील पीडितेच्या शोकात असलेल्या कुटुंबियांची भेट घेण्यासाठी पायी चालत निघालेले काँग्रेसचे नेते खासदार राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांना तेथील पोलिसांकडून झालेल्या धक्काबुक्कीच्या आणि अटकेच्या निषेधार्थ येथे काँग्रेस, महिला काँग्रेस व युवक काँग्रेसच्या वतीने मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा पुतळा जाळून निषेध करण्यात आला.

काँग्रेसकडून उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन

sakal_logo
By
निलेश दिवटे

कर्जत (अहमदनगर) : उत्तरप्रदेश येथील हाथरसमधील पीडितेच्या शोकात असलेल्या कुटुंबियांची भेट घेण्यासाठी पायी चालत निघालेले काँग्रेसचे नेते खासदार राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांना तेथील पोलिसांकडून झालेल्या धक्काबुक्कीच्या आणि अटकेच्या निषेधार्थ येथे काँग्रेस, महिला काँग्रेस व युवक काँग्रेसच्या वतीने मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा पुतळा जाळून निषेध करण्यात आला.

यावेळी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब साळुंखे, जिल्हा उपाध्यक्ष प्रवीण दादा घुले, राष्ट्रवादीचे नेते भास्कर भैलुमे, अल्पसंख्यांक सेलचे माजिद पठाण, युवक शहराध्यक्ष अमोल भगत, ओबीसी सेल चे शहर अध्यक्ष संतोष गोरे,उद्योजक ओंकार तोटे व कार्यकर्ते उपस्थित होते.

नगर जिल्ह्यातील बातम्या वचाण्यासाठी येथे क्लिक करा
बाळासाहेब साळुंके म्हणाले, खासदार राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्त्यांवर उत्तरप्रदेश सरकारने पोलिसी बळाचा वापर करीत त्यांच्यात मर्दुमकी नसल्याचे सिद्ध केले आहे. आपण लोकशाहीत राहत असून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी घालून दिलेल्या राज्यघटनेतील हक्काची त्या सरकारने पायमल्ली केली आहे. यांचा तीव्र शब्दात निषेध करतो. 

प्रवीण घुले म्हणाले, उत्तरप्रदेश येथील हाथरसमधील घटना माणुसकीला काळिमा फासणारी आहे. पीडित निर्भयाच्या कुटुंबियांचे सांत्वन करण्यासाठी निघालेल्या खासदार राहुल गांधी, प्रियांका गांधी यांच्यासह कार्यकर्त्यांवर पोलिसी बळाचा वापर केला. हे हुकूमशाहीचे सरकार असून आगामी काळात त्यांना याची किंमत मोजावी लागेल. या वेळेस कार्यकर्त्यांनी मोदी सरकार हाय हाय, योगी सरकार हाय हाय च्या घोषणांनी आसमंत दणाणून सोडला होता. 

संपादन : अशोक मुरुमकर