पाथर्डीत उत्तर प्रदेश सरकारच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन

राजेंद्र सावंत
Friday, 2 October 2020

इंदिरा काँग्रेस पक्षाच्या वतीने उत्तर प्रदेश सरकारचा प्रतिकात्मक पुतळा जाळण्यात आला. काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांना झालेल्या धक्का बुक्कीचा जाहीर निषेध व्यक्त करण्यात आला.

पाथर्डी (अहमदनगर) : येथे वसंतराव नाईक चौकात इंदिरा काँग्रेस पक्षाच्या वतीने उत्तर प्रदेश सरकारचा प्रतिकात्मक पुतळा जाळण्यात आला. काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांना झालेल्या धक्का बुक्कीचा जाहीर निषेध व्यक्त करण्यात आला. भाजपच्या केंद्रातील सरकारच्या विरोधी यावेळी घोषणाबाजी केली. 

काँग्रेसचे तालुकाध्यक्ष नासीर शेख यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. दोन दिवसांपूर्वी उत्तर प्रदेश मध्ये दलित भगिनीवर झालेल्या अत्याचार घटनेतील आरोपींना तातडीने फाशीची शिक्षा द्यावी. योगी सरकारच्या आदेशाने पोलिसांनी कॉंग्रेसचे नेते खासदार राहुल गांधी यांच्या सोबत धक्काबुक्की करून त्यांच्या सोबत असलेल्या कार्यकरत्यावर केलेल्या लाठी हल्याचा जाहीर निषेधार्थ उत्तर प्रदेश सरकारचा पुतळा जाळण्यात आला.

उत्तर प्रदेश व केंद्र सरकारचा निषेध व्यक्त करण्यात आला.यावेळी काँग्रेस कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करून याघटनेचा तीव्र शब्दात आपल्या भावना व्यक करत योगी आणि मोदींवर हल्ला चढवला. काँग्रेसचे तालुकाध्यक्ष नासीर शेख यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. याप्रसंगी प्रकाश शेलार,संजय डांगे, राजेंद्र बोरुडे,जालिंदर काटे,अजिज शेख, जावेद पिंजारी, अमोल गाडे, सुरेश नगरकर ,वसंत खेडकर, समीर शेख,असलम सय्यद ,रवी पालवे,रोहिदास खेडकर,सरफराज चौधरी, अल्ताफ शेख ,डॉ योगीराज देशमुख, डॉ सुरेश आव्हाड,सिकंदर शेख आदी सहभागी झाले होते. 

संपादन : अशोक मुरुमकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Congress protests Uttar Pradesh government in Pathardi