
महाविकासआघाडी सरकारला यशस्वीरित्या एक वर्ष पूर्ण झाले.
अहमदनगर (अहमदनगर) : महाविकासआघाडी सरकारला यशस्वीरित्या एक वर्ष पूर्ण झाले. यानिमित्त अहमदनगर शहर जिल्हा कॉंग्रेसतर्फे पक्ष कार्यालयात आनंदोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी एकमेकांना गुलाल लावत आणि पेढे भरवीत आनंद साजरा केला.
शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे म्हणाले, की मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष तथा महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली सरकार भक्कमपणे राज्यात काम करीत आहे. हे सरकार जनतेच्या मनातील सरकार असल्यामुळे आपला कार्यकाळ पूर्ण करेल. ज्ञानदेव वाफारे, स्मितल वाबळे यांनी मनोगत व्यक्त केले. तर, डॉ. रिजवान अहमद, डॉ. दिलीप बागल, सय्यद खलील, नलिनी गायकवाड, डॉ. मनोज लोंढे उपस्थित होते. सूत्रसंचालन अन्वर सय्यद यांनी तर आभार मुबिनभाई शेख यांनी मानले.
संपादन : अशोक मुरुमकर