नगर पंचायत निवडणुकीसाठी काँग्रेसची युवा ब्रिगेड लागली कामाला

सतीश वैजापूरकर
Sunday, 18 October 2020

आगामी निवडणुकीसाठी काँग्रेसची युवा टीम कामाला लागली आहे.

शिर्डी : आगामी नगरपंचायतीच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष महसुल मंत्री बाळासाहेब थोरात तसेच महाराष्ट्र युवक कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष सत्यजीत तांबे यांच्या सुचनेवरुन काल व आज युवक कॉंग्रेस व एन. एस. यु. आय संघटनात्मक बांधणीसाठी कॉंग्रेसच्या पदाधिकाऱ्यांची बैठका झाल्या. 

राहाता तालुका कॉंग्रेसच्या वतीने शिर्डी शहरात युवा कार्यकर्त्यांची बैठक झाली. शिर्डी विधानसभा मतदारसंघ कॉंग्रेसचे सुरेश थोरात, एस. यु. आय जिल्हा समन्वयक किरण काळे, युवक कॉंग्रेसचे जिल्हा निरीक्षक अकील पटेल, नवनाथ आंधळे, कार्याध्यक्ष सोमेश्वर दिवटे, एन. एस. यु. आय. जिल्हाध्यक्ष निखिल पापडेजा, गौरव डोंगरे, राहता कॉंग्रेस तालुकाध्यक्ष रावसाहेब बोठे, राहता एन. एस. यु. आय तालुकाध्यक्ष स्वराज त्रिभुवन, राजेंद्र निर्मळ, कॉंग्रेस तालुका उपाध्यक्ष सुभाष निर्मळ, सहसचिव विक्रांत दंडवते, शिवप्रहारचे जिल्हाध्यक्ष सचिन चौगुले, मुन्ना पठाण, आसिफ इनामदार, रमेश गागरे, प्रसाद आहेर, अमोल बनसोडे, मदन कोकाटे, संतोष वाघमारे, कृष्णा गायकवाड, मंगेश खकाले, मोहसीन सय्यद, अनिल इंगळे, प्रवीण मोढे, नितीन वखारे उपस्थित होते. 

नवीन चेहऱ्यांना संधी दिल्याने याचा पक्षवाढीसाठी फायदा होईल, असे मत एन. एस. यु. आयचे जिल्हा समन्वयक किरण काळे यांनी सांगितले. 
संपादन - अशोक निंबाळकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Congress youth brigade started working for Nagar Panchayat elections