
अहिल्यानगर : लोकसभेच्या ४८ पैकी ३१ जागा महाविकास आघाडीने जिंकलेल्या असताना राज्यात सत्ता येईल, अशी परिस्थिती होती. विधानसभेचा निकाल अनाकलनीय आहे. भरमसाठ घोषणा केल्या. आता त्या पूर्ण करणे अशक्य झाले आहे. लाडकी बहीण योजनेला न्यायालयात आव्हान देऊन बंद करण्याचा कट रचला जात आहे, असा आरोप काँग्रेस पक्षाचे जिल्हा पक्ष निरीक्षक तथा माजी आमदार शरद आहेर यांनी केला.