लसीवरून राजकीय खच्चीकरण, राष्ट्रवादीविरूद्ध काँग्रेस-शिवसेना

संग्राम जगताप, किरण काळे
संग्राम जगताप, किरण काळेई सकाळ

अहमदनगर ः कोरोनाला अटकाव करण्यासाठी लसीकरणाचा पर्याय आहे. मात्र, प्रारंभी फ्रंटलाइन वर्करही लस घ्यायला धजावत नव्हते. कोरोनाची दुसरी लाट आल्याने लोकांचे लोंढेच्या लोंढे लसीकरण केंद्रांवर आदळत आहेत. डोस अपुरे पडत असल्याने वशिलेबाजी सुरू झाली आहे. कोव्हिन आणि आरोग्य सेतू अॅपचा सावळा गोंधळ आहे. त्यामुळे जमेल तसे लसीकरण केले जात आहे. यात हजीर तो वजीर असेही घडताना दिसतेय. काही राजकीय नेते यंत्रणेवर दबाव आणून आपल्याच वॉर्डात किंवा कार्यकर्त्यांना लस देण्याचा अट्टहास करीत आहेत.

दुसऱ्याला दिली आम्हाला का नाही, यावरून नगरमध्ये वादंग सुरू आहे. आमदार संग्राम जगताप यांच्यामुळे इतरांना लस मिळत नाही, असा शिवसेनेचा आरोप आहे. राष्ट्रवादी याचा इन्कार करते. काल या वादाला पुन्हा तोंड फुटले.(Controversy among political parties over corona vaccination)

संग्राम जगताप, किरण काळे
मोफत लसीकरणासाठी पैसे! महसूल मंत्र्यांच्या कारखान्याचा फतवा

महापालिकेच्या जुन्या कार्यालयात तीन राजकीय पक्षांचे नेते एकाच वेळी आले. लसीवरून खच्चीकरण सुरू असल्याने शिवसेना नेत्याने यंत्रणेवर आरोप केला. त्यामुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले. त्यावेळी तिसऱ्याच पक्षाचे नेते आल्याने हा वाद चिघळला. त्यांनी थेट फौज फाटा बोलावून घेतला.

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्‍वभूमीवर आमदार संग्राम जगताप यांनी बालरोगतज्ज्ञांची बैठक घेतली. यात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी महापालिकेने व शहरातील वैद्यकीय यंत्रणेने काय उपाययोजना कराव्यात, 18 वर्षांखालील नागरिकांना लसीकरण करण्यात यावे का आदी विषयांवर सविस्तर चर्चा झाली. शहरातील लसीकरण व कोरोनाच्या तिसऱ्या लाटेसंदर्भात आमदार संग्राम जगताप यांनी निवेदन तयार केले. ते घेऊन ते जुन्या महापालिकेतील वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. अनिल बोरगे यांच्याकडे गेले होते. त्याआधीच शिवसेनेचे नगरसेवक बाळासाहेब बोराटे माळीवाडा आरोग्य केंद्रातील लसीकरण प्रक्रियेतील समस्यांचे निवेदन घेऊन डॉ. बोरगे यांच्यासमोर बसले होते. त्याच वेळी आमदार जगताप आपल्या कार्यकर्त्यांसह तेथे पोचले.

या वेळी लसीकरणाबाबत आरोप होऊन राजकीय शाब्दिक वाद सुरू झाला. बराच वेळ हा वाद सुरू होता. काही वेळानंतर कॉंग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे आपल्या कार्यकर्त्यांसह लसीकरणासंदर्भात निवेदन देण्यासाठी तेथे गेले. तेथे वाद सुरू असल्याचे पाहून त्यांनी पोलिसांना खबर दिली. पोलिस आल्याने आणखीच तणाव वाढला. परंतु पोलिसांनी वादावर पडदा टाकला.

संग्राम जगताप, किरण काळे
वाडीतली पोरं सगळ्यात म्होरं ः १६ फौजदार, १४ क्लासवन अधिकारी

मी लसीकरणाच्या प्रश्‍नावर वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. अनिल बोरगे यांना भेटण्यासाठी गेलो होतो. मात्र, या वेळी माझा कोणाशीही वाद झाला नाही. काही जण मुद्दाम स्टंटबाजी करीत आहेत.

- आमदार संग्राम जगताप

मी माळीवाडा येथील आरोग्य केंद्रांत सामान्य नागरिकांना लस मिळत नसल्याच्या प्रश्‍नावर चर्चा करण्यासाठी निवेदन घेऊन महापालिकेत गेलो होतो. त्यावेळी आमदार संग्राम जगताप कार्यकर्त्यांच्या जमावासह तेथे आले होते. त्यावेळी लसीकरणावरून आमच्यात शाब्दिक वाद झाला.

- बाळासाहेब बोराटे, शिवसेना नगरसेवक

शहरातील लसीकरणप्रश्‍नी मी काही कार्यकर्त्यांसह वैद्यकीय आरोग्य अधिकाऱ्यांना भेटण्यासाठी गेलो होतो. त्यावेळी त्यांच्या दालनात नगरसेवक बाळासाहेब बोराटे, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. अनिल बोरगे व आमदार संग्राम जगताप यांच्यासह त्यांचे कार्यकर्ते उपस्थित होते. संबंधितांमध्ये वाद सुरू होता. काही अनुचित प्रकार घडू नये म्हणून मी पोलिसांना बोलावून घेतले.

- किरण काळे, शहर जिल्हाध्यक्ष, कॉंग्रेस

माझ्या दालनात कोणत्याही स्वरूपाचा वाद झालेला नाही. नेते आपल्या कार्यकर्त्यांसह निवेदन देण्यासाठी आले होते.

- डॉ. अनिल बोरगे, वैद्यकीय आरोग्य अधिकारी, महापालिका, नगर

(Controversy among political parties over corona vaccination)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com