Ahilyanagar News: परप्रांतीयांना हद्दपार करण्याचा निघोज ग्रामपंचायतीचा ठराव; अतिक्रमणाचा मुद्दा ऐरणीवर
प्रगतिशील शेतकरी नीलेश भुकन यांच्या गोठ्याला आग लावल्याने बैलगाडा शर्यतीचे बैल भाजून गंभीर जखमी झाले होते. या प्रकरणी भुकन यांच्या फिर्यादीवरून परप्रांतीय लोकांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता.
“Nighoj Panchayat’s migrant eviction resolution triggers legal and social uproar”Sakal
निघोज: सरकारी जागेवर अतिक्रमण करणाऱ्या परप्रांतीय व्यक्तींनी गुन्हेगारी स्वरूपाची कृत्ये केली आहेत. या लोकांना कायमस्वरूपी हद्दपार करण्याचा ठराव बुधवारी (ता.२३) झालेल्या ग्रामसभेत घेतला. उपसरपंच ज्ञानेश्वर वरखडे सभेच्या अध्यक्षस्थानी होते.