कोरोनामुळे हॉटेल बंदचे जिल्हाधिकाऱ्यांचे संकेत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

As the corona in Ahmednagar district is increasing, the Collector Dr. Rajendra Bhosale has ordered to keep the hotel closed

कोरोना रुग्णवाढीबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी चिंता व्यक्‍त केली. प्रशासनाने कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांची कठोरपणे अंमलबजावणी करण्याचा आदेश दिला.

कोरोनामुळे हॉटेल बंदचे जिल्हाधिकाऱ्यांचे संकेत

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

अहमदनगर : जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वेगाने वाढत आहे. त्यावर नियंत्रण आणण्यासाठी कठोर उपाययोजना कराव्या लागणार आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव असाच वाढल्यास जिल्ह्यातील हॉटेले बंद करण्याचे संकेत जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी दिले आहेत.

कोणीही विचलित होऊ नका; मी कार्यकर्त्यांच्या पाठीशी
 
डॉ. भोसले यांनी कोरोना परिस्थितीचा बैठकीत आढावा घेतला. महापालिका आयुक्‍त शंकर गोरे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुनील पोखरणा, निवासी उपजिल्हाधिकारी संदीप निचित, महापालिकेचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. अनिल बोरगे, उपजिल्हाधिकारी पल्लवी निर्मळ, तसेच ऑनलाइनद्वारे पोलिस अधिकारी, जिल्ह्यातील सर्व प्रांताधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी सहभागी झाले होते. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

कोरोना रुग्णवाढीबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी चिंता व्यक्‍त केली. प्रशासनाने कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांची कठोरपणे अंमलबजावणी करण्याचा आदेश दिला. विनामास्क फिरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई, लग्नसोहळ्यास 50 पेक्षा जास्त व्यक्‍ती आढळल्यास कारवाईचा आदेश दिला आहे. हॉटेल, रेस्टॉरंटचालकांनी निम्म्याच संख्येने ग्राहकांना प्रवेश द्यावा. कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांची काटेकोरपणे अंमलबजावणी न केल्यास हॉटेले बंद करावी लागतील, असा इशारा त्यांनी दिला आहे.

loading image
go to top