कुरणमध्ये कोरोनाचा धडाका...आज जिल्ह्यात २१

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 7 जुलै 2020

आज सकाळी पारनेर येथील एक जण तर श्रीरामपूर मधील चौघे असे पाचजण बाधित आढळून आले होते. त्यामुळे आजच्या दिवसात बाधित आढळून आलेल्या रुग्णांची संख्या २१ इतकी झाली आहे.

नगर : संगमनेर तालुक्यातील कुरण गावातील कोरोनाची साथा आटोक्यात येण्याची चिन्हे दिसत नाहीत. दररोज तेथील गावकरी बाधित निघत आहेत. सकाळी पाचजणांचे अहवाल बाधित आले होते. श्रीरामपूरचे चौघे होते.

येथील जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅबमध्ये आज रात्री १६ जणांचे कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आढळून आले.

या मध्ये संगमनेर तालुक्यातील कुरण येथील ११ तर पेमरेवाडी येथील ०१, अकोले तालुक्यातील ब्राह्मणवाडा येथील ०२ पारनेर तालुक्यातील पिंपळगाव येथील ०१ आणि राहाता तालुक्यातील दाढ बु. येथील एक रुग्ण बाधित आढळून आला आहे. 

हेही वाचा - अंडरवर्ल्ड डॉन गवळी बाहेर

दरम्यान, आज सकाळी पारनेर येथील एक जण तर श्रीरामपूर मधील चौघे असे पाचजण बाधित आढळून आले होते. त्यामुळे आजच्या दिवसात बाधित आढळून आलेल्या रुग्णांची संख्या २१ इतकी झाली आहे.
आज सकाळी एकूण ३६ रुग्ण कोरोनावर मात करून घरी परतले.

जिल्ह्यात उपचार सुरू असलेल्या रुग्णांची संख्या:  १९८
बरे झालेल्या रुग्णांची संख्या: ४५५, मृत्यू: १८
एकूण नोंद रुग्ण संख्या: ६७१


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Corona blast in Kuran ... Today 21 in the district