कोरोना कमी होताच ग्रामीण भागात सोने खरेदीवर उड्या

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 5 December 2020

जळगाव येथून आलेल्या सोन्यावर पुणे आणि मुंबई येथून नक्षीकाम करुन घेतले जाते. सध्या विवाह सोहळ्यास प्रारंभ होत असून नवनविन सोन्याच्या दागिने खरेदीचा कल वाढल्याचे त्यांनी सांगितले.

श्रीरामपूर ः कोरोनाच्या संकटात अनेक क्षेत्रातील लहान-मोठ्या व्यवसायांना आर्थिक फटका बसला. लाॅकडाउनमुळे विविध व्यवसाय अडचणीत सापडल्याने अनेकांचे रोजगार गेले. परंतू कोरोनानंतर बाजारपेठेतील आर्थिक घडी सुरळीत होत असताना फायदेशीर गुंतवणूक म्हणून ग्राहकांनी सोने खरेदीला पसंती दिल्याचे समोर आले आहे.

येथील पोपट भगिरथ महाले ज्वेलर्स यांच्या राहाता येथील नूतन शाखेच्या शुभारंभानिमित्त ग्राहकांसाठी रियल डायमंडचे प्रदर्शनाचे आयोजन केले होते. त्यास हजारो ग्राहकांनी सहभाग घेतल्याने प्रदर्शनास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याचे संचालक सचिन महाले यांनी सांगितले.

राहाता येथील गणेश चौक, मुख्यपेठेतील वेशीजवळ महाले ज्वेलर्स (सराफ) यांच्या नूतन शाखेचा धनत्रोयदशीच्या मुहूर्तावर शुभारंभ सोहळा उत्साहात पार पडला.

या निमित्ताने महाले ज्वेलर्स तर्फे ग्राहकांसाठी आकर्षक योजना उपलब्ध केल्या होत्या. सोने-चांदी दागिने मजुरीवर 100 टक्के सवलत, प्रथमच जिल्ह्यात सुलभ हप्त्यांवर सोने खरेदी सुविधा, सोन्याच्या दागिन्यांचा मोफत विमा लागु करण्यात आला आहे.

रियल डायमंडचे प्रदर्शनाचे आयोजन केले. त्यास राहाता परिसरातील हाजारो ग्राहकांनी खरेदीचा आनंद घेतला. कोरोना काळात सर्वच आर्थिक व्यवस्था विस्कळीत झाली. अनेक व्यवसाय अडचणीत आले. त्यामुळे अशा कठिण काळात फायदेशीर गुंतवणूक म्हणुन अनेकांनी सोने खरेदी केली.

सोने-चांदीच्या दागिन्यांच्या मजूरीवर सवलत दिल्याने सोने खरेदी वाढली. भविष्यात सोन्याच्या दरात आखणी वाढ होण्याची शक्यता सचिन महाले यांनी वर्तविली आहे. जळगाव येथून आलेल्या सोन्यावर पुणे आणि मुंबई येथून नक्षीकाम करुन घेतले जाते. सध्या विवाह सोहळ्यास प्रारंभ होत असून नवनविन सोन्याच्या दागिने खरेदीचा कल वाढल्याचे त्यांनी सांगितले.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: As the corona dwindled, so did the buying of gold in rural areas