शेवग्याच्या शेंगामुळे पाथर्डीत शेतकऱ्याला कोरोना

Corona to a farmer in Pathardi
Corona to a farmer in Pathardi
Updated on

नगर ः पाथर्डी तालुक्यातील मोहोज देवढे येथील ४५ वर्षीय व्यक्तीला कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. जिल्हा रुग्णालयाने पुण्याच्या लष्करी वैद्यकीय महाविद्यालयाकडे पाठविलेला या व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.

नगरमध्ये आतापर्यंत जामखेड, नगर शहर, श्रीरामपूर, संगमनेर, नेवासा आदी तालुक्यांत कोरोनाचे रूग्ण होते. आता पाथर्डीत नवा रूग्ण आढळल्याने सर्वच धास्तावले आहेत.

ही व्यक्ती शेतमाल घेऊन मुंबईला गेल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यानंतर त्याला त्रास होऊ लागल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. दरम्यान, आता जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या आता ४४ झाली आहे. 

दरम्यान, गेल्या ५-६ दिवसानंतर जिल्ह्यात पुन्हा कोरोना बाधित व्यक्ती आढळून आल्याने जिल्ह्याच्या सीमेवरील नाकेबंदी कडक करण्याचे आदेश जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी दिले आहेत.

पाथर्डीतील कोरोनाबाधित व्यक्ती ही शेवग्याच्या शेंगा घेऊन वाशी मार्केटमध्ये गेली होती. त्यामुळे तिला त्रास होत होता. आज रिपोर्ट आल्यानंतर सर्वांचे धाबे दणाणले आहे. कारण तो एका पीकअपमध्ये शेंगा विकण्यासाठी गेला होता. जिल्ह्यात आतापर्यंत २५जण घरी गेले आहेत.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Worked by Day, Trained at Dawn: Sangamner Youth Achieves His Police Dream
DNA Test to Solve Rahuri Burial Mystery After Missing Man Reappears Alive
Temple Visit Turns Political: Srikant Shinde Slams Opposition Over Hindutva Stand
Satyajeet Tambe
Marathi News Esakal
www.esakal.com