esakal | कोरोना हटत नाही तोच जगापुढे नवं टेन्शन, शास्त्रज्ञ पडलेत चिंतेत
sakal

बोलून बातमी शोधा

Scientists are concerned about the reduced movement of the sun

हे नवं टेन्शन बाहेरून म्हणजे अवकाश मार्गाने येत आहे. संकट आणणारा दुसरा-तिसरा कोणी नसून आपला जवळचा सूर्यंच आहे. तो जवळचा वाटत असला तरी पृथ्वी आणि सूर्य यांच्यामध्ये 14 कोटी 95 लक्ष 97 हजार 870 किलोमीटर दूर आहे. त्या सूर्याने जग कोरोनाच्या टेन्शनचा सामना करीत असताना वटारून पाहायला सुरूवात केली आहे.

कोरोना हटत नाही तोच जगापुढे नवं टेन्शन, शास्त्रज्ञ पडलेत चिंतेत

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नगर : सध्या कोरोनाने जगात थैमान घातले आहे. अमेरिका, इंग्लंडसारख्या देशांची अर्थव्यवस्था उलथून टाकली आहे. या संकटातून बाहेर पडत नाही तोच नवं टेन्शन जगापुढे वाढून ठेवलं आहे. शास्त्रज्ञांनीही या नव्या संकटाविषयी चिंता व्यक्त केली आहे.

परग्रहावरून येतेय

हे नवं टेन्शन बाहेरून म्हणजे अवकाश मार्गाने येत आहे. ते आणणारा दुसरा-तिसरा कोणी नसून आपला जवळचा सूर्यच आहे. तो जवळचा वाटत असला तरी पृथ्वी आणि सूर्य यांच्यामध्ये 14 कोटी 95 लक्ष 97 हजार 870 किलोमीटर दूर आहे. त्या सूर्याने जग कोरोनाच्या टेन्शनचा सामना करीत असताना वटारून पाहायला सुरूवात केली आहे.

हेही वाचा - देवेंद्र फडणवीस यांना जीवे मारण्याची धमकी

सूर्याच्या या वक्रदृष्टीवर आपले शास्त्रज्ञ बारीक नजर ठेवून आहेत. सूर्याच्या अातील भागात सातत्याने क्रिया होत असतात. परंतु ती घडामोड थांबली आहे. ती थांबणे केव्हाही चांगलं नसतं. ही नव्या संकटांची चाहूल आहे, असं अभ्यासक सांगतात.

स्टारस्पॉटस  

सूर्यमालेत अनेक ग्रहतारे आहेत. ते ग्रह सूर्याची उष्णतेचा वापर करून घेतात. सनस्पॉडच्या अभ्यासातून ही बाब समोर आली आहे. एखाद्या ताऱ्याची क्रिया आणि चमक त्याच्या चुंबकीय क्षेत्राद्वारे म्हणजेच मॅग्नेटिक फिल्डद्वारे होत असते. ज्यामुळे त्यावर गडद डाग तयार होतात. त्यास स्टारस्पॉट्स म्हटले जाते. 

न्यू सायंटिस्टमधील वृत्त काय सांगते

न्यू सायंटिस्टमध्ये सूर्यांच्या क्रीयांबाबत वृत्त प्रकाशित झाले होते.जर्मनीच्या मॅक्स प्लँक सोलर सिस्टम रिझर्स इन्स्टिट्यूटच्या टिमो रेनहोल्ड आणि त्यांच्या टीमने केपलर स्पेस टेलीस्कोपमधून सूर्यासह 396 तार्‍यांच्या हालचाली पाहिल्या. यामध्ये सूर्याच्या पृष्ठभागावरच्या हालचाली मंदावत असल्याचं दिसून आलं.

सूर्याच्या पोटावरील हालचाली मंदावल्या तर भविष्यात नवं संकट निर्माण होऊ शकतं. असं असलं तरी या हालचाली भविष्यात वेगानं वाढू शकतील, अशी आशा आहे.

हा आहे धोका

रेनहोल्ड यांच्या म्हणण्यानुसार सूर्याच्या पृष्ठभागावर ज्वाला आणि सौर वादळ येऊ शकेल. या सौर वादळामुळे पृथ्वीवरील इलेक्ट्रीक ग्रीड्सचं मोठं नुकसान होऊ शकतं. सौर वादळ म्हणजे सूर्याच्या ज्वाला वाढतात आणि त्यामुऴे वेगानं उष्ण वारे तयार होतात. हे वारे सूर्यमालेतील ग्रहांना धोका निर्माण करू शकतात. सोलार स्ट्रोममुळे पृथ्वीच्या चुंबिकीय क्षेत्रावर मोठा परिणाम होऊ शकतो. याचीच शास्त्रज्ञांना चिंता आहे.
 

loading image