'या' जिल्ह्यात वाढताेय काेराेनाचा कहर

The devastation of the Corona in this district
The devastation of the Corona in this district

 नगर ः  जिल्ह्यात गेल्या आठ दिवसांपासून कोरोना आटोक्‍यात येत असताना काल (शुक्रवारी) एकाच दिवसात आणखी सात जणांना कोरोनाची लागण झाली. तर, आज (शनिवार) संगमनेरमधील मृत पावलेल्या व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यामुळे बाधितांच्या संख्येने अर्धशतक पार केले आहे. नव्याने आढळलेले सर्व रुग्ण संगमनेर परिसरातील असल्याने संगमनेरसह कुरण व धांदरफळ हा परिसर सीलबंद करीत 22 मेपर्यंत हॉट स्पॉट घोषित करण्यात आला आहे. हे आदेश जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी जारी केले आहेत. आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यावर कलम 188 नुसार कारवाई करण्यात येणार आहे. 

जिल्हा सामान्य रुग्णालयाने पुण्याच्या लष्करी वैद्यकीय महाविद्यालयाकडे पाठविलेले चार अहवाल आज (शनिवार) प्राप्त झाले. त्यात जामखेड येथील तरुणाचा चौदा दिवसांनंतरचा व संगमनेर येथील मृत व्यक्ती असा दोघांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. 

दरम्यान, संगमनेर येथील एक महिला व धांदरफळ येथील चार जण, असे पाच जण कोरोनाबाधित आढळून आले. त्यानंतर अवघ्या काही तासांतच उर्वरित पाच व्यक्तींचे अहवाल प्राप्त झाले. यात दोन व्यक्ती बाधित असल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे काल दिवसभरात जिल्ह्यात एकूण 7 रुग्ण आढळून आले.

अहवालानुसार बाधित व्यक्तींमध्ये 28 वर्षीय महिला व पाच वर्षीय मुलाचा समावेश आहे. हे दोन्ही बाधित धांदरफळ येथील आहेत. दरम्यान, बाधित व्यक्ती गुरुवारी (ता. 7) संगमनेर येथे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नातेवाईक आहेत.  त्याच मृत व्यक्तीचा आज (शनिवार) अहवाल पॉझिटिव्ह आल्याने आता जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या 53 झाली आहे. 

अत्यावश्‍यक सेवा, वस्तूंच्या विक्रीला बंदी 
संगमनेर शहरातील इस्लामपुरा, कुरण रोड, बिलालनगर, अपनानगर, पानसरे आखाडा, गुंजाळ आखाडा, पुनर्वसन कॉलनी, पावबाकी रस्ता, ज्ञानमाता विद्यालय परिसर, कुरण, धांदरफळ हे क्षेत्र हॉट स्पॉट घोषित केले आहेत. दोन किलोमीटरचा परिसर हा कोअर एरिया म्हणून घोषित केला आहे. या क्षेत्रातील सर्व आस्थापना, दुकाने, अत्यावश्‍यक सेवा, वस्तू विक्री शुक्रवारी (ता. 22) बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. 

प्रत्येक हालचालीवर प्रशासनाचा वॉच 
संपूर्ण संचारबंदीच्या काळात हॉट स्पॉट असलेल्या ठिकाणी प्रत्येक हालचालीवर प्रशासनाची करडी नजर राहणार आहे. नागरिकांच्या मदतीसाठी नियंत्रण कक्ष कार्यरत राहणार आहे. कंट्रोल रूममध्ये रजिस्टर ठेवून त्यामध्ये मागणीच्या नोंदी घेण्यात येत आहेत. त्याप्रमाणे नागरिकांना आवश्‍यक वस्तू पुरवण्यात येत आहेत. दूध, भाजीपाला, फळे, किराणा, औषधे आदी पैसे घेऊन शासकीय यंत्रणेमार्फत पुरविण्यात येणार आहेत. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com