कोरोनाने आज चौदाजणांचा घेतला बळी, संसर्ग वाढताच

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 26 September 2020

जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅबमध्ये 160, खासगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत 236 आणि अँटीजेन चाचणीत 360 रुग्ण बाधित आढळले.

नगर : जिल्ह्यात आज 513 रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची संख्या 36 हजार 157 झाली आहे. काल (शुक्रवारी) सायंकाळी सहापासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रुग्णसंख्येत 756ने वाढ झाली, तर 14 रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला. यामुळे उपचार सुरू असलेल्या रुग्णांची संख्या आता 4570 झाली आहे. 

जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅबमध्ये 160, खासगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत 236 आणि अँटीजेन चाचणीत 360 रुग्ण बाधित आढळले. जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅबमध्ये बाधित आढळून आलेल्या रुग्णांमध्ये शहरातील 67, अकोले 17, जामखेड आठ, कर्जत एक, कोपरगाव दोन, नगर ग्रामीण 13, नेवासे सहा, पारनेर एक, पाथर्डी सात, शेवगाव पाच, श्रीगोंदे 16, श्रीरामपूर नऊ, भिंगार दोन, तर सैनिकी हॉस्पिटलमधील सहा रुग्णांचा समावेश आहे.

खासगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या 236 रुग्णांची नोंद एकूण रुग्णसंख्येत घेण्यात आली. यामध्ये नगर शहरातील 87, अकोले चार, जामखेड तीन, कर्जत आठ, कोपरगाव तीन, नगर ग्रामीण 24, नेवासे 15, पारनेर सात, पाथर्डी नऊ, राहाता 18, राहुरी 19, संगमनेर दोन, शेवगाव दोन, श्रीगोंदे दोन, श्रीरामपूर 32, तर सैनिकी हॉस्पिटलमधील एका रुग्णाचा समावेश आहे. 

अँटीजेन चाचणीत आज 419 जण बाधित आढळून आले. यामध्ये नगर शहरातील 26, अकोले 18, जामखेड 21, कर्जत 14, कोपरगाव 25, नगर ग्रामीण 18, नेवासे 16, पारनेर 17, पाथर्डी 38, राहाता 32, राहुरी नऊ, संगमनेर 56, शेवगाव 36, श्रीगोंदे 10, श्रीरामपूर 23, तर भिंगारमधील एका रुग्णाचा समावेश आहे. 

* बरे झालेले रुग्ण : 36,157 
* उपचार सुरू असलेले रुग्ण : 4,570 
* मृत्यू : 679 
* एकूण रुग्णसंख्या : 41,406 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Corona killed 14 people today