esakal | माहीजळगावमुळे बारामती बाधित... वायरमनमुळे महावितरण अधिकाऱ्यांना फुल्ल टेन्शन
sakal

बोलून बातमी शोधा

Corona patient in Baramati due to Mahijalgaon

नगर जिल्ह्याची हद्द संपून तालुक्यातील चापडगावच्या पुढे करमाळा (सोलापूर जिल्हा) सुरू होतो. या मुळे इथे धोका अधिक अाहे.

माहीजळगावमुळे बारामती बाधित... वायरमनमुळे महावितरण अधिकाऱ्यांना फुल्ल टेन्शन

sakal_logo
By
नीलेश दिवटे

कर्जत: कर्जत तालुक्यात पुन्हा कोरोनाने एंट्री केली आहे. राशीननंतर आता जळगाव (माही)कडे मोर्चा वळवला आहे. कोरोना पॉझिटिव्ह सापडलेल्या पहिल्या रुग्णाच्या संपर्कातील अजून एक व्यक्ती काल बारामती येथे पॉझिटिव्ह निघाली.

या व्यक्तीवर बारामती येथील सरकारी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. बारामतीमध्ये उपचार घेत असलेल्या व्यक्तीच्या संर्कातील जळगावमधील १२ लोकांचे स्वॅब घेऊन तपासणीसाठी पाठवले आहेत, (माहि)जळगावमध्ये पहिला रुग्ण सापडला होता. त्याच्या मुलीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर तिच्या संपर्कात मात्र इतर कोणीही बाधित न आल्यामुळे ही चेन थांबली अशी चर्चा आहे. 

हेही वाचा - पत्नीवर होता संशय..मुलीसोबत केलं असं

इतर रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने ग्रामस्थांना दिलासा मिळाला होता. तरी या व्यक्तीच्या संपर्कातील एक बाहेरची व्यक्ती पॉझिटिव्ह निघाल्याने चिंतेत भर पडली आहे.
माहिजळगाव येथे नगर-सोलापूर राष्ट्रीय महामार्गाला छेदून जाणाऱ्या कर्जत-जामखेड मार्गामुळे चौफुला झाला अाहे. येथून काही अंतरावर खडकत (ता आष्टी) जिल्हा बीड आहे. 

नगर जिल्ह्याची हद्द संपून तालुक्यातील चापडगावच्या पुढे करमाळा (सोलापूर जिल्हा) सुरू होतो. या मुळे इथे धोका अधिक अाहे. बाहेरील व्यक्ती कधीही येऊ शकते. या शक्यतेमुळे निंबोडी फाटा येथे पोलीस तपासणी नाका असणे गरजेचे आहे. येथील ग्रामपंचायतीच्या वतीने जनता कर्फ्यू लागू केला अाहे. त्याची मुदत आणखी दोन दिवस म्हणजे 11 तारखेपर्यंत वाढविण्यात आली आहे.

नियमांचा भंग करणाऱ्यांवर आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत कारवाई करण्यात येईल असा इशारा सरपंच भैरवनाथ शेटे व ग्रामविकास अधिकारी प्रवीण जगधने यांनी दिला आहे. 

माहीजळगावच्या पेशंटच्या संपर्कात दिघी येथील दोघेजण आले आहेत. त्यांच्यामुळे गावात भीतीचे वातावरण आहे. ग्रामपंचायतीकडून काहीच उपाययोजना होत नसल्याने गावात संपात आहे. त्यांचे स्वॅब घेण्याची मागणी होत आहे. चापडगाव येथेही एक कुटुंब क्वारंटाइन केलं आहे. त्यामुळे भीतीत भर पडली आहे.

साहेबांना होता पेशंटच्या घरचा डबा

येथे कोरोना पॉझिटिव्ह सापडलेला रुग्ण हा माहिजळगाव येथील महावितरण शाखेत खासगी वायरमन होता. त्याचा कामानिमित्त सर्वांशी संपर्क होता. महावितरणच्या अधिकाऱ्यांना याच रुग्णाच्या घरून जेवणाचा डबा असायचा. त्या मुळे येथील महावितरण कार्यालय ओस पडले अाहे. 

इतर जे कर्मचारी आहेत ते भीतीने घरात बसले आहेत. तो बाधित रूग्ण किती ग्राहकांचा संपर्क आला होता. त्या बाबतीत सांगता येत नाही. जे कोणी या सर्वांच्या संपर्कात आहेत, त्यांनी सामाजिक आणि पारिवारिक सुरक्षेसाठी पुढे यावे आपली टेस्ट करून घ्यावी व क्वारंटाइन व्हावे

- डॉ संदीप पुंड, तालुका आरोग्य अधिकारी, कर्जत.

संपादन - अशोक निंबाळकर