पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत पतीने केली चिमूरडीची हत्या

A FIR of murder has been registered in Newase taluka
A FIR of murder has been registered in Newase taluka
Updated on

नेवासे (अहमदनगर) : पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत तीन दिवसाच्या चिमूरडीची निर्दयी वडीलाने दगडाने ठेचून हत्या केल्याची संतप्तजनक घटना मक्तापूर (ता. नेवासे) येथे घडली. दरम्यान चिमूरडीचा जीव गेल्यानंतर या निष्ठुर पित्याने तिचा मृतदेह एका ओढ्यात फेकून दिल्याचा प्रकार गुरुवारी (ता. 9) सकाळी उघडकीस आला. पत्नीने दिलेल्या फिर्यादीवरून नेवासे पोलिसांत पतीवर खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे. यातील संशयित आरोपी हा सराईत गुन्हेगार असून पोलिसांनी त्याला अटक केली.
पोलिस निरीक्षक रणजित डेरे यांना खबऱ्याकडून मक्तापूर- भानसहिवरे शिवारात असलेल्या गाढव नाला येथे तीन दिवसाचे स्त्री जातीचे अर्भक मृत अवस्थेत आढळून आल्याची माहिती मिळाली. त्याआधारे पोलिस निरीक्षक डेरे, पोलिस हेड कॉन्स्टेबल महेश कचे, संभाजी गर्जे हे घटनास्थळी गेले. मृतदेहाची पहाणी केल्यावर त्यांना या चिमुकलीची हत्या झाल्याचा संशय व्यक्त केला. दरम्यान या घटनेची माहिती उपविभागीय पोलिस अधिकारी मंदार जवळे यांना दिल्यावर सुमारे तीस- पस्तीस पोलिसांचा ताफा घटनास्थळी आला. याप्रकरणी पोलिस परिसरातील पारधी वस्त्यांवर तपासासाठी गेले असता. एका छपरातून एकजण शेजारीच असलेल्या उसात पळाला. पोलिसांनी त्याचा पाठलाग सुरू केला. दरम्यान अजय मिरीलाल काळे (वय 37, राहणार मक्तापुर शिवार, ता. नेवासे) असे पोलिसांनी पकडलेल्या संशयित गुन्हेगारांचे नाव आहे. तो नेवासेसह नगर, औरंगाबाद पोलिसांना अनेक गुन्ह्यात हवा आहे. दरम्यान त्याची पत्नी प्रिया हिने प्रथम आमच्या भांडणात अजयने मारलेला दगड मुलीला लागल्याने तिचा मृत्यू झाल्याचे सांगितले. मात्र या गुन्हेगाराची पार्श्वभूमी व मुलीचा मृतदेह पहाता चिमुकलीची हत्या केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला. 
चिमुकली मृत्यू प्रकरणी अप्पर अधिक्षक डॉ. दीपाली काळे, उपविभागीय पोलिस अधिकारी मंदार जवळे, पोलिस निरीक्षक रणजीत डेरे यांच्याकडून आरोपी अजय काळेसह त्याच्या पत्नीची कसून चौकशी केली असता. प्रिया हिने अजय हा माझ्या चारित्र्यावर संशय घेत असून त्यातूनच त्याने तीन दिवसाच्या मुलीची हत्या केल्याची सांगितले. आरोपीनेही हत्या केल्याची कबुली दिल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले. नेवासे फाटा येथील ग्रामीण रुग्णालयात मृतदेहाची उत्तरीय तापासणी झाल्यानंतर मक्तापूर येथे मोठ्या पोलिस बंदोबस्तात मृतदेहावर संस्कार करण्यात आले. याप्रकरणी नेवासे पोलिसांत प्रिया अजय काळे हिच्या फिर्‍यादिवरून आरोपी अजय काळे याच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीस अटक करण्यात आली आहे.
उपविभागीय पोलिस अधिकारी मंदार जावळे म्हणाले, अजयनेच मुलीची हत्या केली असावी असा पोलिसांचा संशय होता. चौकशीनंतर तो खरा निघाला. त्याला खुनाच्या गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे.

संपादन : अशोक मुरुमकर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com