esakal | रूग्णांना कोरोनाचं टेन्शन ः बाधित तरूणाने हॉस्पिटलच्या तिसऱ्या मजल्यावरून मारली उडी
sakal

बोलून बातमी शोधा

Corona patient commits suicide in Ahmednagar

या प्रकाराबाबत पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झालेला नसल्याने अधिक माहिती मिळू शकली नाही. तो गेल्या काही दिवसांपासून खासगी रूग्णालयात उपचार घेत असल्याचे सूत्रांनी सांगितले.

रूग्णांना कोरोनाचं टेन्शन ः बाधित तरूणाने हॉस्पिटलच्या तिसऱ्या मजल्यावरून मारली उडी

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नगर ः नगर जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरू आहे. रावापासून रंकापर्यंत बहुतेकांना बाधा होत आहे. बहुतांशी लोकप्रतिनिधींना त्याची लागण झाली आहे. काहींना त्यात जीवही गमवावा लागला. मात्र, काल रात्री नगर शहरात घडलेली घटना खळबळजनक होती.

कोरोनामुळे बहुतेकांचे मानसिक संकुलन बिघडले आहे. त्यातून विविध प्रकारच्या समस्या उभ्या राहिल्या आहेत. काल एका खासगी रूग्णालयात उपचार घेणाऱ्या बाधित तरूणाने आगळिक केली. त्याने रूग्णालयाच्या तिसऱ्या मजल्यावरून खाली उडी मारली. यात त्याचा मृत्यू झाला. या घटनेने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

रूग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. त्यामुळे रूग्णालयात खाटाही मिळणे मुश्कील झाले आहे. जिल्ह्याचा आकडा सतरा हजारांवर गेला आहे. रूग्णालयातून उडी मारणारा तरूण हा पाथर्डी तालुक्यातील आहे. कालच (सोमवारी) तो रूग्णालयात उपचारासाठी दाखल झाला होता. तो मानसिक तणावाखाली असल्याचे समजते.

हेही वाचा - राहुरीत पोलिस ठाण्याच्या आवारातच काय घडलं पहा

या प्रकाराबाबत पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झालेला नसल्याने अधिक माहिती मिळू शकली नाही. तो गेल्या काही दिवसांपासून खासगी रूग्णालयात उपचार घेत असल्याचे सूत्रांनी सांगितले.

नगरमध्ये सावेडीतील एका रूग्णालयात दाखल झाल्यानंतर तो आणखीच तणावाखाली आला. मध्यरात्री कधी तरी त्याने रूग्णालयाची काच फोडून खाली उडी मारली. तेथील डॉक्टरांच्या ही बाब लक्षात आल्यानंतर त्याच्यावर उपचार करण्यात आले. परंतु त्याचा जीव वाचविण्यात त्यांना अपयश आले.

त्या तरूणाने नेमकी कोणत्या कारणातून आत्महत्या केली. हे तपासाअंतीच लक्षात येईल.

संपादन - अशोक निंबाळकर

loading image
go to top