मोठी बातमी ः नगरमध्ये एकाच कुटुंबातील पाचजण बाधित... सथ्था कॉलनीत कोरोनाची सत्ता

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 30 मे 2020

आज तर नगर शहरात मोठा धक्का बसला. एकाच कुटुंबातील पाचजण बाधित आढळून आले. त्यात एक महिला व चार पुरूषांचा समावेश आहे. 

नगर ः नगर शहरात कोरोनाचा कहर सुरू झाला आहे. सुरूवातीच्या काळात दुबईहून एका डॉक्टरने या रोगाचा वानोळा आणला. त्यानंतर तबलिगीने संपूर्ण जिल्हाभर प्रसार केला. आणि लॉकडाउन थोडेसे शिथिल झाल्यानंतर पुणे, मुंबई आणि शेजारील नाशिक, औरंगाबाद येथून आलेल्यांमुळे लोकांना लागण वाढली आहे. दररोज त्यात भर पडत आहे. काल (शुक्रवारी) एकाच दिवशी तेरा रूग्ण आढळून आले. ही सर्वात मोठी आकडेवारी होती.

हेही वाचा - त्या जुळ्यांसाठी कोण गाईल अंगाई..काल जन्म दिला आज कोरोनाने नेली आई

आज तर नगर शहरात मोठा धक्का बसला. एकाच कुटुंबातील पाचजण बाधित आढळून आले. त्यात एक महिला व चार पुरूषांचा समावेश आहे. नगर शहरात उच्चभ्रू समजल्या जाणाऱ्या सथ्था कॉलनीतील कुटुंबाला ही बाधा झाली आहे. याच कुटुंबातील महिला पुणे बाधित झाली आहे.

संगमनेर येथील दोन व्यक्तींचा अहवाल खाजगी प्रयोगशाळेत पॉझिटिव्ह आला आहे. एकंदर जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरू आहे.

जुळ्यांचे रिपोर्ट निगेटिव्ह

जुळ्या मुलांचा कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. दि. २८ मे रोजी कोरोना बाधीत महिलेने दिला होता. काल या नवजात शिशुंचे स्त्राव तपासणीसाठी घेण्यात आले होते. त्यात त्यांचे अहवाल निगेटिव्ह आले. मात्र, त्यांच्या आईचा काल मृत्यू झाला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Corona patients grew in the city of Ahmednagar