
कोरोना संसर्गामुळे हार्मोनियमसह भजनाच्या साहित्याला अजिबातच मागणी नसल्याने सूर जुळवत साहित्याची निर्मिती करणारी ही कला आर्थिक अडचणीच्या बेसूरात सापडली आहे.
सोनई (अहमदनगर) : कोरोना संसर्गामुळे हार्मोनियमसह भजनाच्या साहित्याला अजिबातच मागणी नसल्याने सूर जुळवत साहित्याची निर्मिती करणारी ही कला आर्थिक अडचणीच्या बेसूरात सापडली आहे.
कोरोना संसर्गामुळे मार्च २०२० पासून सर्वच क्षेत्रावर अडचणीचा डोंगर कोसळला आहे.
पायी दिंडी सोहळा, किर्तन, भारुड व भजनाच्या कार्यक्रमास परवानगी नसल्याने हार्मोनियमसह भजन,किर्तनाला आवश्यक साहित्य निर्मितीला ब्रेक लागला आहे. अतिशय कष्टाचे हे काम करत असलेल्या कारागिरावर सध्या उपासमारीची वेळ आली आहे.
नगर जिल्ह्यातील बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
शनिशिंगणापुर येथे नामदेव लक्ष्मण खामकर परीवारातील चार सदस्य हार्मोनियम तयार करण्याचे काम करतात.संपुर्ण सागाचे लाकूड वापरुन साचा केला जातो.साऊंड,भाता व सूरांची पट्टी बनविली जाते. तीन, साडेतीन व पावणेचार सप्तकाचा वापर करुन ३९, ४२ व ४४ सूरांचा वापर यात केला जातो. सूर जुळविण्याचे अतिशय किचकट काम खामकर बन्धू लिलया करतात.
हार्मोनियमसाठी स्वर, स्टाफर, भाता, लेदर, पॅकिंग लेदर, स्प्रिंग आवश्यक असते. अतिशय अवघड व कष्टाचे काम असल्याने या कामासाठी कारागिर भेटत नाही. एका महिन्यात पाच ते सहा हार्मोनियम तयार होत असून एका हार्मोनियमची किंमत आठ ते चाळीस हजारापर्यंत आहे.असे अशोक व दत्तात्रेय खामकर यांनी सांगितले.मागणीच नसल्याने आठ महिन्यापासून हार्मोनियम तयार करण्याचे काम पुर्णपणे बंद असल्याचे खामकर यांनी सांगितले.
संपादन : अशोक मुरुमकर