बापरे! पाथर्डी तालुक्यात कोरोनाबाधित रुग्णांची शंभरी पार; १८ जण कोरोनामुक्त

राजेंद्र सावंत
Monday, 20 July 2020

तालुक्याने कोरोनाची शंभरी पार केली असुन रविवारपर्यंत ११८ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यापैंकी १८ जण कोरोनामुक्त झाले आहेत. कोरोनाची संख्या वाढल्याने शहरात नागरीकामधे भितीचे वातावरण पसरले आहे.

पाथर्डी (अहमदनगर) : तालुक्याने कोरोनाची शंभरी पार केली असुन रविवारपर्यंत ११८ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यापैंकी १८ जण कोरोनामुक्त झाले आहेत. कोरोनाची संख्या वाढल्याने शहरात नागरीकामधे भितीचे वातावरण पसरले आहे.

लॉकडाऊनच्या काळातही रस्त्यावरील गर्दी कमी होताना दिसत नाही. पाथर्डीच्या उपजिल्हा रुग्णालयातील कोवीड सेंटरमधे ९८ जण तर दोघांवर नगरच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत. पाथर्डी शहरात ७१ जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. रोज शहरात २० ते २५ जण कोरोनाबाधीत झाल्याची आकडेवारी समोर येत आहे.

अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

प्रांतअधिकारी देवदत्त केकाण, उपविभागीय पोलिस अधिकारी मंदार जवळे, तहसिलदार नामदेव पाटील, जिल्हा रु्गणालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. अशोक कराळे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. भगवान दराडे, पोलिस निरीक्षक रमेश रत्नपारखी व आरोग्य, पालिका, महसुल व पोलिस विभागाचे सर्व अधिकारी कर्मचारी हे कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठीच्या उपाययोजना करीत आहेत. रात्रदिवस काम करुन ही मंडळी कोरोनाशी लढत आहे. आतापर्यंत पाथर्डी तालुक्यातील ३०० जणांचे स्वॉब घेण्यात आले आहेत. त्यापैंकी ११८ जणांना कोरोनाची बाधा झाल्याचे अहवाल मिळाले आहेत. १८२ जणांचे अहवाल निगेटीव्ह आले आहेत.

आरोग्य विभाग उपचाराबरोबरच कोवीडची साखळी तोडण्यासाठी शहरात रोज आरोग्य सर्वक्षण करीत आहे. नागरीक आजारी असल्याची व बाहेर गावातुन येणाऱ्या- जाणाऱ्यांची माहीती देण्यात टाळाटाळ करीत आहेत. शेजारच्या घरात मुंबई, पुणे व औरंगाबाद येथुन कोण आलय याची माहीत प्रशासनाला दिली जात नाही. कोण बाहेरगावाला जाउन आलाय याचीही माहीती लपविली जाते. स्त्रावाची चाचणी करण्यासाठी येथील श्रीतिलोक जैन विद्यालयात सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. रविवारी ३६ जाणांच्या स्त्रावाची तपासणी करण्यात आली. त्यात शहरातील आठजण व ग्रामिण भागातील चारजण बाधीत असल्याचे समजले.

तहसीलदार नामदेव पाटील म्हणाले, शहरात लॉकडाऊनच्या काळात विनाकारण नागरीकांनी बाहेर पडु नये. बाहेर गावातुन विनापरवाना आलेल्या नागरीकावर गुन्हे दाखल करण्यात येतील. नियम पाळुन प्रशासनाला सहकार्य करावा ही कोरोनाच्या विरोधातील सांघीक लढाई जिंकण्यासाठी मदत कारा.

संपादन : अशोक मुरुमकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Corona report of 118 people in Pathardi taluka is positive