esakal | अहमदनगर : जिल्हाधिकाऱ्यांच्या दौऱ्याप्रसंगी माध्यमांना दूर ठेवण्यामागे गौडबंगाल काय? चर्चेला उधाण
sakal

बोलून बातमी शोधा

rajendra bhosale

किमान स्वतःच्या जिवाची तरी चिंता करा; जिल्हाधिकारी संतापले

sakal_logo
By
टीम ई सकाळ

अमरापूर (जि.अहमदनगर) : जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांच्या नियोजित तालुका दौऱ्याची (ता.३०) कल्पना तहसील कार्यालय व प्रशासनाकडून अधिकृतपणे माध्यमांना दिली गेली नसल्याने सायंकाळी उशिरापर्यंत याबाबतच्या माहितीसाठी पत्रकारांना धावपळ करावी लागली. जिल्हाधिकाऱ्यांच्या दौऱ्याप्रसंगी माध्यमांना दूर ठेवण्यामागील प्रशासनाचे गौडबंगाल मात्र समजू शकले नाही. भातकुडगाव येथील वाढत्या कोरोना रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर डॉ. भोसले यांनी शुक्रवारी (ता. ३०) भेट दिली. त्यावेळी त्यांनी ग्रामस्थांना फटकारले.(Corona-review- meeting-at-Collector-Rajendra-Bhosale-jpd93)

जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले, भातकुडगाव येथे आढावा बैठक

स्वतःच्या जिवाची तरी चिंता करा. अजूनही कोरोना संसर्गाची लाट कमी झालेली नाही. तुमच्या बेजबाबदार व निष्काळजी वर्तणुकीमुळे इतरांचे जीव धोक्यात घालू नका. प्रशासनाला आणि आरोग्य विभागाला सहकार्य करा, अशा शब्दांत जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी भातकुडगाव (ता. शेवगाव) येथील ग्रामस्थांना फटकारले. या वेळी ग्रामपंचायत, प्राथमिक आरोग्य केंद्र व प्रशासनाकडून आढावा घेत गाव सात दिवसांसाठी प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करून दुकाने व आस्थापना बंद ठेवण्याचे आदेश त्यांनी दिले. गावात तातडीने कोविड सेंटर सुरू करून बाधित रुग्णांसाठी उपचार सुविधा उपलब्ध करून द्याव्यात. बाधितांना इतरांच्या संपर्कात येऊ देऊ नका. सूचना व नियम न पाळणाऱ्या नागरिक व आस्थापनांविरुद्ध कडक कारवाई करा, तालुक्यातील चाचण्यांचे प्रमाण वाढवून लक्षणे आढळल्यास विलगीकरण कक्षात ठेवा, अशा सूचना त्यांनी दिल्या. तालुक्यातील गावनिहाय रुग्णसंख्या : शेवगाव- १५९, प्रभुवाडगाव- १२३, भातकुडगाव -८१, हसनापूर -३६, बोधेगाव -३४, शिंगोरी-२९, राणेगाव -२७, खानापूर -२४, दहिगाव-ने-२४, चापडगाव -२३, भायगाव २२, गदेवाडी -२२, थाटे -२२, खरडगाव -२१, मंगरूळ बुद्रुक -२१, वडुले खुर्द-२०, आखेगाव तितर्फा -१९, गोळेगाव -१७ अशी जुलै महिन्यातील १२०७ सक्रिय रुग्णसंख्या झाली आहे.

जिल्हाधिकाऱ्यांच्या दौऱ्याप्रसंगी माध्यमांना दूर ठेवण्यामागील गौडबंगाल काय?

जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांच्या नियोजित तालुका दौऱ्याची कल्पना तहसील कार्यालय व प्रशासनाकडून अधिकृतपणे माध्यमांना दिली गेली नसल्याने सायंकाळी उशिरापर्यंत याबाबतच्या माहितीसाठी पत्रकारांना धावपळ करावी लागली. जिल्हाधिकाऱ्यांच्या दौऱ्याप्रसंगी माध्यमांना दूर ठेवण्यामागील प्रशासनाचे गौडबंगाल मात्र समजू शकले नाही.

तहसीलदार अर्चना भाकड, गटविकास अधिकारी महेश डोके, सहायक पोलिस निरीक्षक सुजित ठाकरे, तालुका आरोग्य अधिकारी संकल्प लोणकर, जिल्हा परिषद सदस्य रामभाऊ साळवे, माजी सभापती संजय कोळगे, आरोग्याधिकारी सुप्रिया लुणे, संचिता तपे, विस्ताराधिकारी सुरेश पाटेकर, सरपंच सरस्वती वाघमोडे, सेवा संस्थेचे अध्यक्ष पाराजी नजन, सुधाकर लांडे, राजेंद्र आढाव, अशोक मेरड, राजेंद्र फटांगरे, कल्याण काळे, ग्रामसेवक, तलाठी आदी उपस्थित होते.

हेही वाचा: अहमदनगर : निर्बंध कायम, मात्र वरखेड जत्रेत मोठी गर्दी!

हेही वाचा: घरगुती गॅस सिलिंडरची चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश!

loading image
go to top