esakal | अहमदनगर : निर्बंध असूनही वरखेड जत्रेत मोठी गर्दी; तालुका प्रशासन अनभिज्ञ?
sakal

बोलून बातमी शोधा

varkhed jatra

अहमदनगर : निर्बंध कायम, मात्र वरखेड जत्रेत मोठी गर्दी!

sakal_logo
By
चंद्रकांत दरंदले

सोनई (जि.अहमदनगर) : कोरोना आपत्तीच्या काळातही शुक्रवार (ता.३०) वरखेड (ता. नेवासे) येथील लखाईदेवीच्या यात्रेस भाविकांची गर्दी झाली होती. ( devotees-crowd-at-varkhed-jatra-in-corona-restrictions-jpd93)

नियम धाब्यावर बसवून वरखेडला जत्रा

वरखेड ग्रामपंचायत, कोरोना नियंत्रण समिती, पोलिस पाटील व देवस्थान विश्वस्त गावातीलच असतानाही येथे आज सकाळपासून दर्शन व देवीला नैवेद्य दाखविण्यासाठी भाविकांनी गर्दी केली होती. कोरोना स्थिती असतानाही कुणीच तालुका प्रशासनास कळविले नाही, हे विशेष. दुपारी तीन नंतर तहसीलदार रूपेशकुमार सुराणा याची माहिती मिळताच त्यांनी पोलिस निरीक्षक विजय करे व पोलिसांचा ताफा घेत गाव गाठले. उपस्थित भाविकांना कारवाईचा इशारा दिला. त्यामुळे भाविकांनी व व्यावसायिकांनी काढता पाय घेतला.दुपारनंतर तहसीलदार व पोलिस यंत्रणेने कारवाईचा दंडुका उगारल्याने व्यावसायिक व भाविक निघून गेले.

हेही वाचा: जायकवाडीची तूट नगर-नाशिकच्या मानगुटीवर; २१ टीएमसीचे आव्हान

हेही वाचा: शालेय पोषणआहारात प्लॅस्टिकसदृश तांदूळ; नमुना तपासणीसाठी

loading image
go to top