
नगर ः नगर शहरातील रस्त्यांवर विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांना पकडून त्यांची अँटिजेन चाचणी करण्याचा धडाका आज महापालिका व पोलिसांच्या संयुक्त पथकाने लावला. सर्व पक्षीय नेत्यांनी नुकतीच महापौर बाबासाहेब वाकळे यांच्याकडे अशी मागणी केली होती. (Corona testing of city travelers for no reason)
लॉकडाउनचा आदेश न जुमानता आज काही नागरिक नेहमी प्रमाणे विनाकारण रस्त्यावर फिरत होते. अशा नागरिकांना महापालिका व पोलिसांच्या पथकाने अडवले. त्यांची जागेवरच रॅपिड अँटिजेन चाचणी करण्यात आली.
पत्रकार चौक, जिल्हा पोलिस अधीक्षक चौक या दोन ठिकाणी या पथकाने विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांवर कारवाई केली. यात जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालय चौकात 67 जणांच्या चाचण्या घेण्यात आल्या. यात दोन जण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले.
उद्यापासून (सोमवार) शहरातील इतरही ठिकाणी अशाच प्रकारे अचानकपणे येऊन हे पथक रस्त्यावर फिरणाऱ्या नागरिकांची रॅपिड अँटिजेन चाचणी करणार आहे. पॉझिटिव्ह आढळलेल्या नागरिकांना तातडीने कोविड सेंटरमध्ये रवानगी करण्यात येणार आहे. त्यामुळे नागरिकांनी विनाकारण रस्त्यावर फिरू नये, असे आवाहन महापालिकेचे उपायुक्त यशवंत डांगे यांनी केले आहे.
कडक लॉकडाउन मुदतवाढीवर आज निर्णय
महापालिका आयुक्त गोरे यांनी सात दिवसांचा कडक लॉकडाउन जाहीर केला होता. या लॉकडाउनची मुदत उद्या (सोमवारी) संपत आहे. मात्र शहरातील उपनगरांच्या मोठ्या भागात अजूनही शेती होते. त्यामुळे या भागातील शेतकऱ्यांना त्यांचा शेतमाल विकू द्यावा अशी मागणी शेतकरी संघटनांनी केली आहे. त्यामुळे महापालिकेतील अधिकारी व शेतकरी संघटनेचे नेते यांच्यात बैठक होऊन कडक लॉकडाउनला मुदतवाढ द्यायची अथवा नाही. याबाबत निर्णय होईल, असे महापालिकेचे उपायुक्त यशवंत डांगे यांनी सांगितले. (Corona testing of city travelers for no reason)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.