रेमडेसिव्हिरचा काळाबाजार सुरूच, रॅकेटमधील चौघांना अटक

नेवासा तालुक्यातील वडाळा येथील घटना
remdesivir 2.jpeg
remdesivir 2.jpege sakal

सोनई (अहमदनगर) ः वडाळाबहिरोबा (ता.नेवासे) येथे कोरोना संसर्गाचा फायदा घेण्याच्या उद्देशाने रेमडेसिव्हीर (ramadesivir) इंजेक्शन विक्री रॅकेटवर गुन्हे अन्वेषण पथकाने छापा टाकून चार जणास अटक केली आहे. यातील एक आरोपी फरार झाला आहे. (Four people have been arrested for illegally selling ramadesivir)

remdesivir 2.jpeg
पारनेरमधील 112 वस्त्यांसाठी साडेपाच कोटींचा निधी

या बाबत शनिशिंगणापुर पोलिस ठाण्याकडून समजलेली माहिती अशी, सध्या कोवीड १९ हा साथीचा रोग सुरु असताना बाहेरुन आणलेले सहा रेमडेसिव्हीर इंजेक्शन वडाळाबहिरोबा येथील हाॅटेल समधान समोर विक्री करणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर गुन्हे अन्वेषण पथकाने छापा टाकून सहा इंजेक्शन, एक चारचाकी वाहन, मोटारसायकल व मोबाईल ताब्यात घेवून रॅकेटमधील चार जणास अटक केली आहे.

विनापरवाना रेमडेसिव्हीर इंजेक्शन ३५ हजार रुपायास विक्री करण्याच्या कारणावरुन रामहरी बाळासाहेब घोडेचोर (रा.देवसडे ता.नेवासे), आनंद पुंजाराम थोटे (रा.भातकुडगाव ता.शेवगाव), पंकज गोरक्षनाथ खरड (रा.देवटाकळी ता.शेवगाव) व सागर तुकाराम हंडे (रा.खरवंडी ता.नेवासे) या चौघास अटक करण्यात आली आहे.

वडाळ्यातील एक आरोपी फरार झाला आहे. गुन्हे अन्वेषणचे सहायक पोलिस निरीक्षक सोमनाथ दिवटे व पथकाने ही कारवाई केली. सहायक पोलिस निरीक्षक सचिन बागुल अधिक तपास करीत आहेत.(Four people have been arrested for illegally selling ramadesivir)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com